मुंबई-दिल्लीवर मोठं संकट! श्वास घेतानाही होणार त्रास? ऐन दिवाळीत शहरात…

मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले

मुंबई-दिल्लीवर मोठं संकट! श्वास घेतानाही होणार त्रास? ऐन दिवाळीत शहरात...
Diwali Air Pollution
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 7:46 AM

दिवाळीच्या उत्सवात फटाके फोडण्याच्या सपाट्याने मुंबईतील हवा प्रदूषणाची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. आज मुंबईचा सरासरी एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) १७१ वर पोहोचला असून, काही भागांमध्ये हवा ‘अत्यंत अस्वस्थ’ श्रेणीत गेली आहे. बांद्राच्या खेरवाडी भागात AQI २६४ तर बीकेसीत २३१ इतका नोंदवला गेला आहे. हे आकडे शहरातील सर्वाधिक प्रदूषित भाग म्हणून समोर आले आहेत.

मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले होते. मात्र, दिवाळीच्या दिवसांमध्ये या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने शहरातील प्रदूषण पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Loading...

आकडेवारीनुसार, देवनार येथे AQI २२६, घाटकोपरमध्ये २२१, चेंबूरमध्ये २१६, तर नेव्ही नगर-कुलाबा परिसरात २१३ इतका नोंदवला गेला. मालाडमध्ये १९१, वरळीत १४८ आणि सायन येथे १२१ इतका AQI आहे. बांद्रा आणि बीकेसी हे भाग सर्वाधिक प्रदूषित असल्याचे दिसून येत आहे. फटाक्यांमधून निघणारे सूक्ष्म कण (PM २.५ आणि PM १०) श्वसनाच्या समस्या वाढवतात. लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना याचा जास्त धोका असतो. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले.

दिल्लीत देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पाहायला मिळत आहे. द एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (EWS) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ९ नोव्हेंबरपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत जाण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस ती याच स्थितीत राहू शकते. दिवाळीच्या रात्री दिल्लीवर धुराचे एक आवरण पसरले होते, ज्यामुळे रस्त्यावरील दिवे अंधूक दिसत होते आणि संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला होता. राजधानीत उत्सवाचा जोर वाढल्यामुळे २० देखरेख केंद्रांवरील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ (severe) श्रेणीत पोहोचली होती, तर रात्री १० वाजता एकूण ‘हवेची गुणवत्ता निर्देशांक’ (Air Quality Index) ३७१ इतका नोंदवला गेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us