Muslims Not Allowed… हायवेवर आक्षेपार्ह घोषणा… 2 तरुणींसह एकाला अटक, काय आहे संपूर्ण भानगड?

मुस्लीम लोकांना प्रवेश नाही... हायवेर आक्षेपार्ह घोषणा लिहिणाऱ्या दोन तरुणी आणि तरुण कोण? पोलिसांनी केलीये अटक, पण काय आहे संपूर्ण भानगड? जाणून घ्या...

Muslims Not Allowed…  हायवेवर आक्षेपार्ह घोषणा... 2 तरुणींसह एकाला अटक, काय आहे संपूर्ण भानगड?
| Updated on: Mar 13, 2026 | 3:31 PM

हायवेवर आपण पाहतो अनेक पोस्टर आणि घोषणा लिहिलेल्या असतात. ज्यामुळे अनेकदा वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण होते… पण आता तर हायवेवर लिहिणाऱ्या दोन तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हायवेवर Muslims Not Allowed… म्हणजे मुस्लीम लोकांना प्रवेश नाही… असं लिहिलेलं. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. दिल्ली-डेहराडून महामार्गावर जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांविरुद्ध सहारनपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महामार्गाच्या रस्त्यावर आक्षेपार्ह आणि जातीय टिप्पण्या लिहिल्याबद्दल पोलिसांनी दोन तरुणी आणि एका तरुणाला अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आणि तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित प्रकरण काही दिवसांपूर्वीचं आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर काही अज्ञात लोकांनी स्प्रे पेंटचा वापर करत, इंग्रजीमध्ये आक्षेपार्ह घोषणा लिहिलेल्या. ज्यामध्ये एका विशिष्ट समुदायाला मार्गावर प्रवेश नाही… असं लिहित आक्षेपार्ह घोषणा केलेली. मार्गावर मुसलमान लोकांना प्रवेश नागी… या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिटावर सर्वत्र व्हायरल झाला. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण झालेली… यावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली…

व्हिडीओ बनवून पोलिसांना दिलं आव्हान

संबंधित घटनेनंतर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. कथित आरोपी हिंदू सुरक्षा दलाशी जोडलेले आहे. कारवाई दरम्यान, आरोपींचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये आरोपी पोलिसांना जाहिरपणे आव्हान देताना दिसले… या व्हिडीओनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

सबळ पुराव्याच्या आधारे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिस पथकाने डेहराडून आणि आसपासच्या भागात छापे टाकले. अखेर, द्वेषपूर्ण संदेशातील मुख्य आरोपी असलेल्या दोन महिलांना आणि त्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. आरोपींचा मुख्य उद्देश जातीय तणाव निर्माण करणे आणि वातावरण बिघडवणे होता… अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us