AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका!

काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. अटल बिहारी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एनडीए सरकार आले. एनडीएचे सरकार पहिल्यांदा आल्यानंतर विकासात गती कशी येते, हे आपल्याला पाहयला मिळाले, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका!
NARENDRA MODIImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 8:12 PM
Share

Narendra Modi Speech : पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला सत्तेत येऊन आज 12 वर्षे पूर्ण झाली. मोदी यांच्या सत्तेला एकूण 4399 दिवस झाले आहेत. दरम्यान, एनडीए सरकारच्या या घोडदौडीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. काँग्रेस सत्तेत असताना विकास कसा खुंटला होता, आम्ही सत्तेत आल्यानंतर विकासाला कशी गती मिळाली, याबाबत मोदी यांनी सविस्तर सांगितले. यावेळी त्यांनी काही आकडेवारीदेखील मांडली. त्यांनी जनतेचेही आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झालेला आहे. काँग्रेसने देशाला लाचारी, हीन भावानेत ढकलून दिलं होतं. भारतात विकास हळूहळूच होतो, असं वारंवार सांगितलं जात होतं. भारतात गतीने विकास करणे शक्यच नाही, असे काँग्रेसकडून भासवले जात होते. या हळूहळू विकासाला हिंदू ग्रोथ रेट असे नाव दिले होते. ही कार्यशैली काँग्रेसची होती, अपयश काँग्रेसचे होते, उत्तरदायीत्व काँग्रेसचे होते. परंतु कलंक मात्र देशातील हिंदू लोकसंख्येवर लावलण्यात आला.

पहिल्यांदा एनडीएची सत्ता आली तेव्हा…

काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. अटल बिहारी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एनडीए सरकार आले. एनडीएचे सरकार पहिल्यांदा आल्यानंतर विकासात गती कशी येते, हे आपल्याला पाहयला मिळाले. परंतु दुर्दैवाने 2004 साली देश पुन्हा अस्थिरतेच्या वादळात आणि काँग्रेसच्या सत्तेत फसून गेला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर देशाला हजारो, कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ढकलून दिले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार