ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे तीन मोठे निर्णय कोणते?, दुसरा निर्णय अत्यंत धाडसी; मोदींनी थेटच सांगितलं

ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित केले आहे. आपल्या या संबोधनात मोदी यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार केला आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी आपल्या संबोधनात पाकिस्तानचं थेट नाव घेतलं आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे तीन मोठे निर्णय कोणते?, दुसरा निर्णय अत्यंत धाडसी; मोदींनी थेटच सांगितलं
narendra modi and india pakistan war
| Updated on: May 12, 2025 | 9:24 PM

Pm Narendra Modi Speech: ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित केले आहे. आपल्या या संबोधनात मोदी यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार केला आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी आपल्या संबोधनात पाकिस्तानचं थेट नाव घेतलं आहे. पाकिस्तान दहशतवादाला पोसतो आहे. भविष्यात आमच्यावर असे हल्ले झाले तर आम्ही सहन करणार आहे. आमच्या अटी-शर्तींवर आम्ही दहशतवादाची पाळमुळं उखडून काढू, असं मोदी यांनी पाकिस्तानला थेट सुनावलं आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर तीन मोठे निर्णय घेतले आहेत. या तीन निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तानवर पडणार आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

“ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील लढाईत नवा अध्याय चालू केला. पहिली गोष्ट म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर उत्तर देणार. ज्या ठिकाणाहून दहशतवाद पोसला जात आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही कठोर करावाई करू. दुसरी गोष्ट अणुयुद्धावरून केलं जाणारं ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. अणुयुद्धाच्या ब्लॅकमेलिंगच्या आडून पोसल्या जात असलेल्या दहशतवादी तळांवर भारत निर्णायक हल्ला करणार करू. तिसरी गोष्ट म्हणजे दहशतवादाला पोसणारे सरकार आणि दहशतवादाचे म्होरके यांना आम्ही वेगळं पाहणार नाही,” असं मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं.

दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली

तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान दुनियाने पाकिस्तानचा खरा चेहरा पाहिला आहे. ज्या दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्याच दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे मोठे ऑफिसरर्सने हजेरी लावली. देशपुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे,’ असं मोठं भाष्यही मोदी यांनी केलं.

ट्रेड-टेटर, ट्रेड-चर्चा सोबत होऊ शकत नाही

यासह मोदी यांनी पाकिस्तानसोबतचा व्यापार, चर्चा आणि सिंधू जलवाटप करार यावरही भाष्य केलं. व्यापार आणि दहशतवाद हे एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवादाला पोसणं आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. यासह रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं मोदी थेट सांगितलं आहे. याशिवाय भविष्यात आमच्यावर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले तर आम्ही गय करणार नाही. आमच्या अटींवर आम्ही दहशतवाद्यांना धडा शिकवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे.