Akshay Khanna: अक्षय खन्ना सेटवर गलिच्छ राजकारण करायचा; लेखकाचा खळबळजनक आरोप
Akshay Khanna: सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, एका लेखकाने अक्षय खन्नावर गंभीर आरोप केले आहेत. आता हे आरोप नेमके काय आहेत चला जाणून घेऊया...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना हा चांगलाच चर्चेत आहे. ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटातील त्याची रहमान डकैत ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, अक्षय ‘दृश्यम ३’ या चित्रपटामुळे देखील चांगलाच चर्चेत आहे. त्याने अचानक या चित्रपटातून एग्झिट घेतली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट ‘सेक्शन 375’चे लेखर मनिष गुप्ता यांचा एक जुना इंटरव्ह्यू चर्चेत आहे. त्यांनी दावा केला होता की अक्षय खन्ना चित्रपटाच्या सेटवर गलिच्छ राजकारण करायचा आणि त्याचा कामाच्या वातावरणावर परिणाम व्हायचा.
सप्टेंबर 2025 मध्ये ‘कॉस्मिक कनेक्शन’ पॉडकास्टशी बोलताना मनिष गुप्ता यांनी हा खुलासा केला होता. ‘मला सेक्शन 375 लिहिण्यासाठी तीन वर्षे लागली होती. मी 160 न्यायालयीन कार्यवाहींमध्ये सहभागी झालो. खूप संशोधन केलं, न्यायाधीश, वकील आणि बलात्कार पीडितांना भेटलो. मला या चित्रपटाची आयडिया शाइनी आहूजा प्रकरणातून मिळाली होती. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा मी मुंबईतच होतो. मी माझ्या मित्रासोबत लगेच ओशिवारा (पोलिस स्टेशन) येथे पोहोचलो आणि पोलिसांकडे त्यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारले. तेव्हा मला कळलं की कायदा असा नाही जसा आपण समजतो’ असे मनिष गुप्ता म्हणाले.
वाचा: गिरिजा ओकच्या सौंदर्यावर इम्रान हाश्मी फिदा, विमानत तिला पाहिलं अन् सतत.. काय घडलं?
शाइनी आहूजा प्रकरणातून चित्रपट बनवण्याची आयडिया मिळाली
मनिष गुप्ता यांनी पुढे सांगितलं की, ‘बरोबर की चूक हे ठरवणं नंतर येतं, आधी अटक होते. त्या वेळी कायदा असाच होता. मी स्वतःला म्हणालो, हे तर खूप चुकीचं आहे आणि तेव्हाच मी यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.’ स्वतःची आपबीती सांगताना मनिष गुप्ता म्हणाले की दिग्दर्शक असूनही त्यांना फक्त लेखनाचं क्रेडिट दिलं गेलं.
प्रोड्यूसर आणि अक्षय खन्ना यांनी केलं गलिच्छ राजकारण
त्यांनी या मुलाखतीमध्ये पुढे सांगितलं की, ‘संपूर्ण चित्रपट मीच लिहिला होता. प्री-प्रोडक्शनचं सर्व काम मीच केलं. अगदी अक्षय खन्ना, ऋचा चड्ढा आणि राहुल भट्ट यांना चित्रपटासाठी मीच पटवून साइन केलं. खरंतर चित्रपटाचा दिग्दर्शकही मीच होतो, पण प्रोड्यूसर आणि अक्षय खन्ना यांनी माझ्यासोबत खूप गलिच्छ राजकारण केलं. मला फक्त लेखनाचं क्रेडिट देऊन बाजूला केलं गेलं. हाच बॉलिवूडचा खरा चेहरा आहे.
