PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख ठरली

PM Narendra Modi : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन होत आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी मिळून नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख समोर आलीय.

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख ठरली
PM Narendra Modi
| Updated on: Jun 07, 2024 | 3:48 PM

देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन होत आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी मिळून नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित भाजपा आणि एनडीए नेते तसेच नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केलं. संबोधन संपल्यानंतर नरेंद्र मोदी तात्काळ राष्ट्रपती भवनात गेले. तिथे त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह चिराग पासवान आणि एनडीएचे 15 पेक्षा जास्त नेते उपस्थित होते. मोदींसह घटक पक्षांचे जे नेते राष्ट्रपती भवनात गेले, त्यामध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्रबाबू नायडू, नीतीश कुमार, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुदेश महतो, अनुप्रिया पटेल, एचडी कुमारस्वामी आणि चिराग पासवान होते.

EVM जिवंत आहे की मेलं?

“4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


कधी आहे शपथविधी?

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख समोर आलीय. नरेंद्र मोदी यांचा येत्या 9 जूनला म्हणजे रविवारी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी होणार आहे.