Navjot Singh Sidhu : मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाचा कारावास, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: May 19, 2022 | 3:06 PM

हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाळा येथील कार पार्किंगवरून वाद झाला.

Navjot Singh Sidhu : मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाचा कारावास, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Navjot Singh Sidhu
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आज त्यांच्यावर सुरू असलेल्या रोडरेज (Road Rage Case) प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली. हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाळा येथील कार पार्किंगवरून वाद झाला. या वादात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांना या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून शिक्षा झाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने हत्या करण्याचा हेतू नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर दोन वर्षांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संबंधित प्रकरण न्यायालयात गेल्यावर सत्र न्यायालयाने पुरावे नसल्याने सिद्धूला 1999साली निर्दोष ठरवले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. हायकोर्टाने 2006 साली सिद्धूला 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड केला. या विरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 16 मे 2018 रोजी हत्येचा हेतू नसल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला आरोपातून मुक्त केले. पण आयपीसी कलम 323 नुसार दोषी ठरवले. यामुळे तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही फक्त 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

प्रकरण 1988 सालचे

सिद्धू यांच्या विरुद्धचे रोडरेज प्रकरण 1988 सालचे आहे. सिद्धूंचे पटियाळा येथे कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंह या व्यक्तीशी भांडण झाले होते. सिद्धू यांच्यावर असा आरोप आहे की या वादात त्यांनी मारहाण देखील केली होती. सिद्धूने गुरनाम सिंह यांना केली. त्यानंतर गुरनाम यांचे निधन झाले. पंजाब पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह सिद्धू यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर आत गुरनाम सिंह यांच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सिद्धूला आयपीसी कलम 304 नुसार शिक्षा झाली पाहिजे असे याचिकेत मागणी करण्यात आली असून न्यायालयाने संबंधित याचिका स्विकारली होती. दरम्यान,  पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.