Belly fat | बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा, रिझल्ट लगेचच मिळेल!

Belly fat | बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा, रिझल्ट लगेचच मिळेल!
Image Credit source: pritikin.com

जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली, गाजर यांचा समावेश करा. तसेच हंगामी फळांचा देखील समावेश करा. फळे आपल्याला वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात. संत्री, सफरचंद, केळी आणि बेरी वजन कमी करतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 19, 2022 | 2:09 PM

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे अनेकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. वजन वाढले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम (Work from home) करण्यावर अनेकांचा भर आहे. वर्क फ्रॉम होममध्ये माणूस एकाच जागी दिवसभर बसतो. शारिरीक हालचाली अत्यंत कमी झाल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे वजन (Weight) झपाट्याने वाढत आहे. विशेष: पोटावरील चरबी आणि पोटावरील चरबी बर्न करणे अत्यंत अवघड काम आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार महत्वाचा आहे. आहारामध्ये (Diet) हेल्दी गोष्टींचा समावेश करून आपण वाढलेले वजन झटपट कमी करू शकतो.

आहारात या गोष्टींचा समावेश करा

जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली, गाजर यांचा समावेश करा. तसेच हंगामी फळांचा देखील समावेश करा. फळे आपल्याला वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात. संत्री, सफरचंद, केळी आणि बेरी वजन कमी करतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ओट्स वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करा.

हे सुद्धा वाचा

झोप महत्वाची

आपल्या सर्वांचीच लाईफस्टाईल दिवसेंदिवस खराब होत जात आहे. रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर टाईमपास करत बसल्यामुळे झोपण्यासाठी उशीर होतो. परिणाम सकाळी उठायला उशीर होतो. यामुळे धावपळीतच आपण आॅफिस गाठतो. त्यानंतर दिवसभर चहा, काॅफी आणि फास्टफूडचे अतिसेवन करतो. यामुळे झपाट्याने वजन वाढते आहे. जर पुरेशी झोप मिळाली नाही तर वजन वाढते. यामुळे शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते आणि आपण जास्त कॅलरीयुक्त अन्न खातो. म्हणूनच आपल्याला किमान 7 ते 8 तासांची झोपे घेणे महत्वाचे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें