एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मोदी म्हणाले, ‘त्यांच्या अनुभवाचा देशाला फायदा होणार…’

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनडीएकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर आज राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मोदी म्हणाले, त्यांच्या अनुभवाचा देशाला फायदा होणार...
Radhakrishnan and Modi
| Updated on: Aug 18, 2025 | 4:37 PM

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले आहे. आता 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनडीएकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर आज राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विमानतळावर राधाकृष्णन यांचे स्वागत केले. भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राधाकृष्णन याचे कौतुक केले आहे.

सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर ट्विट करत म्हटले की, ” आज सीपी राधाकृष्णन जी यांची भेट घेतली. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांची सार्वजनिक सेवा आणि विविध क्षेत्रातील अनुभव आपल्या देशासाठी फायदेशीर ठरेल. ते देशाची अशीच सेवा करत राहोत अशी सदिच्छा”.

9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2027 पर्यंत होता, मात्र त्यापूर्वीच त्यांनी पद सोडल्याने आता ही निवडणूक होणार आहे.

कोण आहेत सीपी राधाकृष्णन?

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. राधाकृष्णन 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते

सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते. 2016 ते 201 पर्यंत ते अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2004, 2012 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते.