NEET-PG परीक्षांचा निकाल जाहीर; आरोग्य मंत्री मांडवियांनी पात्र उमेदवारांचे केले अभिनंदन

| Updated on: Jun 02, 2022 | 12:17 PM

आरोग्य मंत्री मांडवीय यांनी आपल्या ट्विटमधये त्यांनी लिहिले आहे की, "NEET PG चा निकाल जाहीर झाला असून, NEET-PG उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांत जाहीर केल्याबद्दल मी National Board Of Examination यांचे कौतुक करतो असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

NEET-PG परीक्षांचा निकाल जाहीर; आरोग्य मंत्री मांडवियांनी पात्र उमेदवारांचे केले अभिनंदन
सर्वोच्च न्यायालयाने मागणी फेटाळली!
Follow us on

नवी दिल्लीः राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (National Board Of Examination) बुधवारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-PG (NEET PG) चा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा (NEET Exam) ही दिली होती त्यांना आता हे ते त्यांचे निकाल natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी NEET PG निकाल जाहीर झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. या वर्षीच्या परीक्षेचे एक विशेष हे आहे की, यंदा NEET PG चा निकाल अवघ्या दहा दिवसामध्ये जाहीर केला गेला आहे. आरोग्य मंत्री मांडविया यांनी ट्विट करून पात्र उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

 

आरोग्य मंत्री मांडवीय यांनी आपल्या ट्विटमधये त्यांनी लिहिले आहे की, “NEET PG चा निकाल जाहीर झाला असून, NEET-PG उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांत जाहीर केल्याबद्दल मी National Board Of Examination यांचे कौतुक करतो असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी natboard.edu.in ला भेट द्या असेही त्यांनी सांगितले आहे.

NEET PG निकाल 2022: असा पाहा निकाल

NEET PG चा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम natboard.edu.in या वेबसाइटवर पाहा.

या ठिकाणी तुम्हाला होम पेजवर NEET PG निकालाची लिंक दिसणार आहे, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक टाकावा लागणार आहे. आणि नंतर सबमिट करावा लागणार आहे.

या सर्व प्रोसेसनंतर विद्यार्थ्यांना NEET PG चा निकाल समोर दिसेल. यावेळी तुम्हाला त्यांची प्रिंटही तुम्ही घेऊ शकणार आहात.

यंदा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने अवघ्या 10 दिवसात NEET PG चा निकाल जाहीर केला आहे. 21 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.