Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर

CJP Protest : सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही सीजेपी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका दीपकेंनी स्पष्ट केली आहे.

Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर
| Updated on: Jul 24, 2026 | 8:51 AM

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरुणांचं आंदोलन मोदी सरकार देखील गांभीर्याने घेताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यान नवी दिल्लीत मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनी उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण मार्गाने सुरू राहील. केंद्रीय शिक्षणमंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.’. त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण संपुष्टात आल्यानंतरही कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने 20 जून रोजी जंतर-मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली होती. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी सीजेपीची आहे. मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. याच आंदोलनात सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं.

सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांना आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली होती. परंतु काही दिवसातच सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून दीपकेंनी उपोषण सोडलं. दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं रुग्णालयातून उपोषण सुरू होतं. या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचं वजन खूप घटलं होतं. त्यांचं उपोषण रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरू होतं. परंतु आंदोलन भडकल्याने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी वांगचुक यांची भेट घेतली. त्यानंतर आज उशिरा रात्री केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं.

Follow Us