देशात आता नवीन व्हायरस, औषधी ठरताय बेअसर, ICMR ची गाईडलाईन काय ?

| Updated on: Mar 05, 2023 | 7:53 AM

विषाणूमुळे खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिले आहेत.

देशात आता नवीन व्हायरस, औषधी ठरताय बेअसर, ICMR ची गाईडलाईन काय ?
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाच्या धक्क्यातून अजून कुठे जग सावरतेय. अन् गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन व्हायरसचे संकट आले आहे. घरोघरी या व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी सर्व औषधीसुद्धा उपयोगी ठरत नाही. ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या विषाणूमुळे खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिले आहेत.

ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितले की, भारतात मागील दोन-तीन महिन्यांपासून खोकला असलेले रुग्ण वाढले आहे. त्यास इन्फ्लुएन्झा A विषाणू H3N2 कारणीभूत आहे. त्यावर संशोधन सुरु आहे. ICMR ने या व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावे आणि काय करु नये, याची यादीही दिली आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशभरात खोकला, सर्दीसाठी मोठ्या प्रमाणावर एंटीबायोटिक औषधींचा उपयोग होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आयसीएमआरचा सल्ला काय?

हे सुद्धा वाचा
  1. साबणाने नियमित हात स्वच्छ करा.
  2. आजाराचे लक्षणे आढळली तर मास्क वापरा.
  3. खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा.
  4. द्रवरूप पदार्थांचे अधिक सेवन करा.
  5. ताप तसेच अंगदुखी असेल तर पॅरासिटामॉल घ्या.
  6. हा खोकल्याचा संसर्ग आहे, त्यामुळे कोरोनाकाळात ती काळजी घेतली ती घ्यावी.

काय आहे नेमका हा प्रकार?

  1. ‘इन्फ्लुएंझा ए’ या विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो.
  2. हा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे मास्क घाला.
  3. रोगप्रतिकारकी शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा खा.
  4. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात.
  5. आता उन्हाळा सुरू झाला असून पाणी जास्त प्रमाणात ठेवावे.
  6. लहान मुलांना ताप-खोकला येत असल्यास शाळेत पाठवू नये.

ताप जातो, खोकला कायम

IMA च्या तज्ज्ञांनुसार या प्रकारात येणारा ताप 5 ते 7 राहतो. आयएमएच्या एंटी-माइक्रोबियल रेसिस्टेंसच्या समितीने ताप तीन दिवसांत जात असल्याचे म्हटले आहे. मात्र खोकला तीन ते चार आठवडे असू शकतो.

डॉ. वेद यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोना आला होता. त्यावेळी लोकांनी चांगली काळजी घेतली. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. परंतु आता लोक नियमांचे पालन करत नाही. त्याचा परिणाम इम्यूनिटीवर झाला आहे. यामुळे व्हायरल इंफेक्शन अपर रेस्पिरेटरी इंफेक्शनमध्ये बदलू शकतो. त्यात वारंवार खोकला येणे, वारंवार सर्दी होणे, डोके दुखणे, ताप येणे, अंग दुखणे असे प्रकार होत आहेत.