‘डी’ कंपनीची भारतातील कटकारस्थानं वाढली; NIA कडून दाऊदवर 25 लाख, छोटा शकीलवर  20 लाखाचं बक्षीस

| Updated on: Sep 01, 2022 | 12:32 PM

दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून भारतात नेहमीच काही ना काही कटकारस्तानं केली जात असतात. शस्त्रास्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट चलनाची तस्करी या आणि अशा कारवाई करण्याबरोबरच पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कारवायाही नेहमीच केल्या जात असतात.

डी कंपनीची भारतातील कटकारस्थानं वाढली; NIA कडून दाऊदवर 25 लाख, छोटा शकीलवर  20 लाखाचं बक्षीस
पाक कनेक्शन ते अंडरवर्ल्ड डॉन
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय तपास सुरक्षा संस्थेने (NIA) (National Investigative Security Agency) दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या इतर लोकांवरही वेगवेगळी बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) टोळी भारतात अनेक कटकारस्थानं करण्यात गुंतली आहे. शस्त्रास्त्रे, स्फोटकं, ड्रग्ज आणि बनावट चलनाच्या तस्करीबरोबरच या टोळ्या पाकिस्तानी एजन्सी आणि देशातील दहशतवादी संघटनेच्या सहकार्याकडून दहशतवादी कारवाया (terrorist activities) करण्यात सक्रिय झाली आहे. याबाबत माहिती सांगताना अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सीने इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ ​​हाजी अनीस, त्याचा जोडीदार जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील आणि इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेनन उर्फ ​​टायगर मेनन यांच्या प्रमुखांवरही आरोप करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेकडून दाऊदवर 25 लाख, छोटा शकीलवर  20 लाख आणि बाकीच्यांवर अनीस, चिकना, मेननवर 15 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील कराचीमध्ये लपून बसलेला दाऊद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक प्रकरणांमध्ये भारतातील तपास यंत्रणांकडून दाऊदचा शोध घेण्यात येत आहे.

दाऊद इब्राहिमवर 25 लाखाचे बक्षीस

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून यापूर्वीच दाऊदवर 2003 मध्ये 25 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दाऊदशिवाय भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबूल मुजाहिद्दीनचा संस्थापक सईद सलाहुद्दीन आणि त्याचा खास अब्दुल रौफ असगर यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

‘डी’ कंपनीकडून भारतात विशेष युनिट

एनआयएच्या माहितीनुसार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये तपास यंत्रणांकडून दाऊदविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंटेलिजेंस इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘डी’ कंपनीकडून भारतात विशेष युनिट सुरू करण्यात आले असून त्यामार्फत दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने देशातील बडे राजकारणी आणि व्यावसायिकांना लक्ष्य बनवत आहेत.

स्लीपर सेलला मदत

एवढेच नाही तर भारतात राहणाऱ्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाच्या स्लीपर सेलला मदत करणे आणि भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देणे हा त्यांचा हेतू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दाऊदच्या विरोधात 29 ठिकाणी छापे

या वर्षी मे महिन्यात एनआयएने दाऊदच्या विरोधात 29 ठिकाणी छापे टाकले होते, त्यामध्ये हाजी अली दर्गा आणि माहीम दर्गा ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्याशी संबंधित असलेले लोक, 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी समीर हिंगोरा, सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, छोटा शकीलचा नातेवाईक गुड्डू पठाण यांचाही समावेश होता. दाऊदच्या भावाचा भिवंडी येथील नातेवाईक इक्बाल कासकर आणि कय्युम शेख यांचाही यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आल आहे.