युद्ध सुरु असताना भारताला हादरवण्याचं कारस्थान उघड, NIA ची मोठी Action

मध्य पूर्वेत युद्ध सुरु असताना भारताला हादरवण्याचा एक मोठा कट उघड झाला आहे. यात परदेशी शक्तींचा हात असण्याची दाट शक्यता आहे. NIA ने या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.

युद्ध सुरु असताना भारताला हादरवण्याचं कारस्थान उघड, NIA ची मोठी Action
NIA Arrest
| Updated on: Mar 17, 2026 | 12:04 PM

भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यात सहा युक्रेनी आणि एक अमेरिकन नागरिक आहे. मागच्या आठवड्यात NIA ने UAPA कलम 18 अंतर्गत अन्य कलमांखाली कारवाई केली होती. शुक्रवारी संध्याकाळी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. अमेरिकी नागरिकाला कोलकाता विमानतळावर ब्युरो ऑफ इमिग्रेशनने ताब्यात घेतलं. सहापैकी तीन युक्रेनी नागरिकांना लखनऊ तर तिघांना दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं. हे परदेशी नागरिक वीजा घेऊन भारतात आले व मिझोरम सारख्या संरक्षित क्षेत्रात पोहोचले असा तपास यंत्रणांचा आरोप आहे. त्यानंतर हे म्यांमारला गेले व तिथे जाऊन बंडखोर गटांशी संपर्क साधला.

यांनी म्यांमारमध्ये प्रशिक्षण घेतलं असं एनआयएच म्हणणं आहे. भारतात दहशतवाद, हिंसाचार घडवणारे हे गट आहेत. त्यांच्याशी या लोकांचा संपर्क होता. युरोपमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात ड्रोन आणल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

हरीश अली नावाच्या एका युवकाला अटक

दुसऱ्या एका प्रकरणात उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने ISIS शी कथित संबंध असल्याच्या आरोपावरुन BDS च्या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. ATS ला माहिती मिळालेली की, काही लोक ISIS चे सदस्य म्हणून सक्रीय आहेत. एजन्सीने याचा सखोल तपास केला. चौकशीनंतर पोलिसांनी हरीश अली नावाच्या एका युवकाला मुरादाबाद येथून अटक केली. तो सहारनपुर जिल्ह्यातील राहणारा आहे. सध्या ATS या प्रकरणात पुढील चौकशी करत आहे.

या प्रकरणातील सत्य समोर येईल

मध्य पूर्वेत युद्ध सुरु असताना भारताला हादरवण्याचा एक मोठा कट उघड झाला आहे. यात परदेशी शक्तींचा हात असण्याची दाट शक्यता आहे. सखोल तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल. ईशान्य भारतात काही घडवण्याचा परदेशी शक्तीचा इरादा होता का? हा मुख्य मुद्दा आहे. कारण आरोपी मिझोराममध्ये जाऊन आले आहेत. सध्या युद्धामुळे वातावरण बिघडलेलं आहे.

Follow Us