Nidhi Tiwari Case : दोन मुलांचा बाप असलेला इंजिनिअर आवडला तिथेच निधीच्या आयुष्याची घडी विस्कटली, आईच्या खुलाशाने नवीन ट्विस्ट

Nidhi Tiwari Case : सध्या सोशल मीडिया इनफ्लुएंसर निधी तिवारी मृत्यू प्रकरणा गाजत आहे. आता निधीच्या आईने काही नवीन खुलासे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ट्वविस्ट निर्माण झाला आहे. निधी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती.

Nidhi Tiwari Case : दोन मुलांचा बाप असलेला इंजिनिअर आवडला तिथेच निधीच्या आयुष्याची घडी विस्कटली, आईच्या खुलाशाने नवीन ट्विस्ट
Nidhi Tiwari Case
| Updated on: Sep 29, 2026 | 7:24 PM

सध्या सोशल मीडिया इनफ्लुएंसर निधी तिवारी मृत्यू प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. निधीच्या मृत्यूनंतर तिची आई हेमलता तिवारी यांनी मुलीच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नवीन प्रश्न निर्माण झालेत. आईने जे सांगितलय त्या नुसार, निधी कुटुंबातली मोठी मुलगी होती. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासह बैढनमध्ये आलिशान घर बांधत होती. त्याचवेळी तिच्या आयुष्यात एक विवाहित पुरुष आला. त्याचं लग्न झालेलं. त्याला दोन मुलं होती. निधीची त्या पुरुषासोबत जवळीक वाढू लागली. मध्ये प्रदेशच्या सिंगरौलीमधील हे प्रकरण आहे.

निधी, मोरवाच्या एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. त्याच हॉटेलमध्ये एनसीएलशी संबंधित आउटसोर्सिंगच्या कामासाठी येणारा सोनू सिंह थांबायचा. सोनू पंजाबचा रहाणारा आहे. पेशाने तो इंजिनिअर आहे. निधीची आई हेमलता तिवारी यांनी ही माहिती दिली. हॉटेलमध्ये काम करता, करता, निधी आणि सोनूची ओळख झाली. हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली. सोनू विवाहित असल्याचं नंतर कुटुंबला समजलं. त्याला दोन मुलं आहेत. कुटुंबियांनी निधीला त्याच्यापासून लांब राहण्यासाठी समजावलं. पण हेमलता यांच्यानुसार त्याने काही फरक पडला नाही. दोघेही परस्परांच्या संपर्कात होते.

Loading...

त्यावरही सोनू निधीला प्रश्न विचारायचा

निधीच्या आईने सोनू आपल्या मुलीवर सतत लक्ष ठेवत असल्याचा आरोपही केला. आईने सांगितलं की, निधीच्या कानात सतत ब्लूटूथ असायचा. ती सोनूच्या संपर्कात असायची. निधी कुठे आहे, काय करतेय हे जाणून घेण्यात सोनूला इंटरेस्ट होता असं निधीची आई हेमलता यांनी सांगितलं. घरात कोणी नातेवाईक आला, तर त्यावरही सोनू निधीला प्रश्न विचारायचा. निधी बराचवेळ ऑनलाइन असायची. ब्लूटूथने सोनूच्या संपर्कात असायची. पण या आरोपांची पृष्टी झालेली नाही.

भविष्यासाठी ती मेहनत करत होती

निधी कुटुंबातली मोठी मुलगी होती. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निभावण्यात तिचं मोठं योगदान होतं. वडिल अशोक तिवारी एका कंपनीत नोकरी करायचे. पण नंतर ट्रान्सफर झाल्यावर कुटुंबापासून ते वेगळे राहत होते. त्यानंतर हेमलता यांनीच मुलांना लहानाचं मोठं केलं. निधी बैढन येथे स्वत:साठी आलिशान घर बनवत होती. घर आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी ती मेहनत करत होती. खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे तिच्या जीवनात तणाव निर्माण झालेला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us