नितीन गडकरी राजकारण सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, अचानक नेमकं काय घडलं?
नितीन गडकरी राजकारण सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु त्यांनी दावे फेटाळून लावले आहेत.

बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. यावेळी सोळंके यांनी राजकीय वारसरदाराची घोषणा केली. प्रकाश सोळंके यांच्यानंतर आणखी एका नेत्याच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमधील नितीन गडकरी यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गडकरी यांनी राजकीय संन्यास घेतल्यास नागपूरसह महाराष्ट्रातील राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. परंतु राजकीय निवृत्तीच्या चर्चा स्वत: नितीन गडकरी यांनी फेटाळून लावल्या आहेत.
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की, माझ्या जुन्या विधानाचा एक व्हिडिओ हा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय निवृत्ती घेणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी शनिवारी 17 व्या ‘एग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनात हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, तुम्ही तुमचं काम करत राहा. मी माझं काम करत राहीन’. नितीन गडकरी यांनी स्पष्ट म्हटलं की, मी फक्त एवढंच बोलू इच्छित होतो की, आता युवकांनी पुढे यायला हवं. परंतु माझ्या या विधानाचा अनेक माध्यमांनी, इंटनेट युजर्सने चुकीचा अर्थ काढला. मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतोय, असा अर्थ त्यांनी काढला. परंतु तो अर्थ सारासारा चुकीचा आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
प्रकाश सोळंकेची निवृत्तीची घोषणा
बीडच्या माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी एका कार्याक्रमात त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. तर माझा पुतण्या जयसिंग सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल, असं मोठं विधान प्रकाश सोळंके यांनी केलं. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सोळंके यांनी राजकारणातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. आता माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.