विकसित भारताचे नॉर्थ ईस्ट इंजिन बनणार, ज्योतिरादित्य शिंदे यांचे प्रतिपादन

गेले आठ दिवस नॉर्थ ईस्टमध्ये आम्ही रोड शो आणि रॅली करीत आहोत. गेल्या आठ दिवसात रोड शो आणि रॅलीद्वारे विविध कंपन्यांशी 2 लाख 60 हजार कोटींचे करार झाले आहेत. एकूण 4 लाख 18 हजार कोटी MOU आणि LOU मुळे उत्तर पूर्व भारतात विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.

विकसित भारताचे नॉर्थ ईस्ट इंजिन बनणार, ज्योतिरादित्य शिंदे यांचे प्रतिपादन
| Updated on: May 23, 2025 | 5:20 PM

2047 साली भारत विकसित राष्ट्र होणार आहे. त्यासाठी नॉर्थ ईस्ट हे ग्रोथ इंजिन बनणार असल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे केले आहे. जेव्हा येथे तुम्ही आला होतात तेव्हा गुंतवणूकींच्या शक्यता होत्या. आता शक्यतांची पूंजी आहे. नऊ महिन्यांच्या काळात सर्व मुख्यमंत्री आणि आमच्या सर्व उद्योजकांच्या संगतीने जे शक्य झाले त्याचा आलेख पाहाता. रोडशोद्वारे 2 लाख 60 हजार कोटींचे एमओयू आणि एलओयू कॉर्डीनेट झाले आहेत आणि आमच्या इंडस्ट्रीयल हाऊसेसद्वारा 1 लाख 60 हजार कोटीची गुंतवणूक झाली आहे. अशा प्रकारे दोन्ही मिळून या एकूण 4.18 लाख कोटीचा एमओयू आणि एलओयूची शक्यता समोर आली आहे.

येथे पोस्ट पाहा –

2025 से 2035 अशी नवीन ग्रोथ स्टोरी नॉर्थ इस्टमध्ये साकार होणार असून पंतप्रधान यांचे 2047 ला विकसित भारत बनविण्याच्या महत्वाकांक्षाला एक ग्रोथ इंजिनम्हणून नॉर्थ ईस्ट काम करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री ज्योतिरात्य शिंदे यांनी म्हटले आहे.

गेले आठ दिवस रॅली आणि रोड शोद्वारे गुंतवणूक

गेले आठ दिवस नॉर्थ ईस्टमध्ये आम्ही रोड शो आणि रॅली करीत आहोत. गेल्या आठ दिवसात रोड शो आणि रॅलीद्वारे विविध कंपन्यांशी  2 लाख 60 हजार कोटींचे करार झाले आहेत. एकूण 4 लाख 18 हजार कोटी MOU आणि LOU मुळे उत्तर पूर्व भारतात विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.

विकासाचे प्रथम प्रवेशद्वार केले

ज्या पूर्वोत्तर क्षेत्राला विकासचे अंतिमद्वार समजले जायचे त्यास , आदरणीय पंतप्रधानांनी विकासाचे प्रथम प्रवेशद्वार म्हणून परावर्तित केले आहे. एवढेच नाही तर विकसित भारताच्या संकल्पनेची सुरुवात जर कुठू करायची असेल तर ती उत्तर पूर्वी क्षेत्रातून होईल असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले.

येथे पाहा पोस्ट –

स्टेटेजिक हब बनवले

गेल्या दहा वर्षात १० टक्के ग्रॉस बजेटरी सपोर्ट वाढवून पावणे दोन सात लाख कोटीची गुंतवणूक उत्तर पूर्वी राज्यात शक्य केली आहे. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅक्स डेव्हेल्युशनला वाढवून साडे पाच लाख कोटीची गुंतवणूक या आठ राज्यात केली आहे. पंतप्रधानांनीच ग्रँट इन ऐटला दुप्पट करून पाच लाख कोटीची अतिरिक्त गुंतवणूक या राज्यात केली आहे. या उत्तर पूर्वी क्षेत्राला ट्रान्सफॉर्मेशन टू ट्रान्सपोर्टेश आधारे या क्षेत्राला स्टेटेजिक हब बनवले आहे असेही ज्योतिरात्यदित्य यावेळी म्हणाले.