आता 24 तास कधीही मानाने फडकवा तिरंगा, केंद्र सरकारच्या नियमांत बदल, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

| Updated on: Jul 23, 2022 | 10:50 PM

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवातंर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्टच्या काळात प्रत्येक घरात तिरंगा या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. त्या कार्यक्रमासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. प्रत्येक घरात तिरंगा फडकावण्याच्या या कार्यक्रमामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसेच प्रत्येक घराघरात तिरंगा फडकावून राष्ट्रप्रेम जागृत करण्याचाही हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते आहे.

आता 24 तास कधीही मानाने फडकवा तिरंगा, केंद्र सरकारच्या नियमांत बदल, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – स्वातंत्र्या्च्या अमृत महोत्सवानिमित्ताने (75 years of Independence)केंद्र सरकारने प्रत्येक घरात तिरंगा या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत 11 ते 17 ऑगस्टच्या काळात, आपआपल्या घरात राष्ट्रध्वज तिरंगा (tricolor)लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनासाठी सरकारने (Center Government)राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल केला आहे. राष्ट्रध्वज आता दिवसा आणि रात्री फडकवण्याची अनुमती नियमांनुसार दिली गेली आहे. त्याचबरोबर पॉलिस्टर आणि मशीनने तयार केलेला राष्ट्रध्वज तिरंगाही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवातंर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्टच्या काळात प्रत्येक घरात तिरंगा या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. त्या कार्यक्रमासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. प्रत्येक घरात तिरंगा फडकावण्याच्या या कार्यक्रमामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसेच प्रत्येक घराघरात तिरंगा फडकावून राष्ट्रप्रेम जागृत करण्याचाही हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते आहे.

केंद्रीय गृह सचिवांनी सगळ्या राज्यांना पाठवले पत्र

सगळ्या केंद्रीय मंत्रालयांना, विभागांना आणि सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी लिहिले आहे की – भरताचा राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, फडकावणे आणि उपयोग हा भारतीय ध्वज संहिता, 2002 आणि राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, 1971 च्या अखत्यारित येतो. या पत्रानुसार, भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये 20 जुलै 2022 रोजी एका आदेशानुसार बदल करण्यात आलेला आहे.

काय आहे नवा नियम

भारतीय ध्वज संहिता 2002 च्या भाग दुसऱ्यातील परिच्छेद 2.2 मध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जिथे राष्ट्रध्वज मोकळ्या जागेत किंवा कुठल्या नागरिकाच्या घरात लावण्यात येईल,तिथे दिवसा आणि रात्री त्याला फडकवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापूर्वी तिरंग्याला केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवण्याची अनुमती होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका नियमातही बदल करण्यात आला आहे. त्या बदलात लिहिण्यात आले आहे की – राष्ट्रध्वज हा हातानी तयार केलेला किंवा मशिनवर तयार झालेला असोल. कापूस, पॉलिस्टर, उन, रेशीम खादीपासून तो तयार झालेला असावा. यापूर्वी मशिननी तयार केलल्या किंवा पॉलिस्टरच्या राष्ट्रध्वजाला अनुमती नव्हती.

2002 साली काय झाला होता नियमात बदल

2002 सालापूर्वी सामान्य नागरिकांना केवळ स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनीच राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. २६ जानेवाीर 2002 मध्ये यात संशोधन करुन कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवू शकतो. अशी परवानगी देण्यात आली.