रेल्वे दुर्घटनेनंतर ‘कोरोमंडल एक्सप्रेस’ होणार मार्गस्थ; हा असा असणार आहे मार्ग…

| Updated on: Jun 06, 2023 | 11:46 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय तपासाबाबत सांशकता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातादिवशी अपघातस्थळी दाखल झाल्या होत्या. तर मंगळवारी पुन्हा भुवनेश्वर आणि कटक येथे जाऊन अपघातग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती.

रेल्वे दुर्घटनेनंतर कोरोमंडल एक्सप्रेस होणार मार्गस्थ; हा असा असणार आहे मार्ग...
Follow us on

कोलकाता : बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर आता पाच दिवसांनंतर कोरोमंडल एक्सप्रेस उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. ओडिशातील बहंगा बाजार स्थानकाजवळ गेल्या शुक्रवारी संध्याकाळी या रेल्वेला अपघात झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी कोरोमंडल एक्स्प्रेस बुधवारी दुपारी 3.30 वाजता शालिमार येथून पुन्हा चेन्नईसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य चौधरी यांनी सांगितले की, ही ट्रेन पूर्वीच्या मार्गावरुनच धावणार आहे. म्हणजेच बुधवारी दुपारी 3.20 वाजता ही ट्रेन शालिमारहून चेन्नईसाठी सुटणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या शुक्रवारी या बहंगा स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला होता. या दुर्घटनेत 288 जणांचा मृत्यू झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहेत.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी 40 हून अधिक रेल्वे गाड्या त्या मार्गावरून धावल्या. तर मंगळवारीही त्या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

बुधवारी रद्द झालेल्या गाड्यांची संख्या चार होती. गाड्या रद्द झाल्या तरी ही दिलासा देणारी गोष्ट आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.अपघातानंतरही कोरोमंडल एक्स्प्रेसच्या तिकिटांची मागणी अजिबात कमी झालेली नाही.

कोरोमंडलची सर्व आरक्षित तिकिटे बुधवारी विकली गेली असून बहुतांसी तिकिटे संपली आहेत. तर मंगळवारी कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचा तपास आता सीबीआयने सुरु केला आहे.

तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय तपासाबाबत सांशकता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातादिवशी अपघातस्थळी दाखल झाल्या होत्या. तर मंगळवारी पुन्हा भुवनेश्वर आणि कटक येथे जाऊन अपघातग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती.

कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या अपघातातील पीडितांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. तर पीडितांच्या वारदारांपैकी एक व्यक्तीला नोकरीची संधी दिली जाणार आहे.