शेतकऱ्यांची थट्टा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये कर्ज माफ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये ते 300 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय. मध्य प्रदेशतील खरगोन भागातील हा प्रकार आहे. तर प्रशासनाच्या मते, 31 मार्च […]

शेतकऱ्यांची थट्टा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये कर्ज माफ
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये ते 300 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय.

मध्य प्रदेशतील खरगोन भागातील हा प्रकार आहे. तर प्रशासनाच्या मते, 31 मार्च 2018 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय त्यांचं कर्ज माफ करण्यात आलंय. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.

जय किसान ऋण मुक्ति योजना मध्य प्रदेशात जाहीर करण्यात आली आहे. सध्या याची अंमलबजावणी सुरु आहे. काही गावांमध्ये लाभार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. पण ‘जागरण’च्या वृत्तानुसार, फक्त 25 रुपयांपर्यंतचंच कर्ज माफ झाल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलाय. जैतपूरच्या एका शेतकऱ्याचं 25 रुपये कर्ज माफ झालं, तर सिकंदरपुरातील शेतकऱ्याचे 300 रुपये माफ झाले.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीत घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात येतोय. ग्वालियर जिल्ह्यातील 76 सहकारी समित्यांमध्ये हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. या समित्यांनी शेतकऱ्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायतीच्या कार्यालायत लावली. पण यामध्ये असे नावं निघाले, ज्यांनी कधी कर्ज घेतलंच नव्हतं.

शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा सहकारी बँका आणि सहकारी समित्यांमध्ये तक्रारी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मते, आम्ही कर्ज घेतलेलं नसतानाही ते माफ करण्यात आलंय. जिल्हा सहकारी बँकेकडून सहकारी समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जातं.