…तर प्रेतावर रडणारंही कोणी राहणार नाही, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून अनुराग ठाकूर यांनी पाकला ठणकावलं!

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानला चांगलंच ठणकावलं आहे. आगामी काळात दहशतवादी हल्ला झाला तर खैर नाही, असं ठाकूर यांनी म्हटलंय.

...तर प्रेतावर रडणारंही कोणी राहणार नाही, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून अनुराग ठाकूर यांनी पाकला ठणकावलं!
anurag thakur
| Updated on: May 22, 2025 | 7:00 PM

Anurag Thakur : दहशतवाद्यांनी भारताच्या पहगाम येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिलं. भारताच्या या मोहिमेत दहशतवाद्यांची अनेक तळं उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच या हल्ल्यात एकूण 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येतं. असे असतानाच आता याच ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. भारतावर वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत केली आणि भविष्यात भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर दहशतवाद्यांच्या प्रेतावर हडणारंही कोणी शिल्लक राहणार नाही, असं ठाकूर यांनी पाकिस्तानला बजावलं आहे. ते हिमाचल प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करत होते.

भारताकडे नजर वाकडी करून पाहिलं तर…

पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांच्या आड लपून भारताविरोधात लढाई खेळत आहे. कारगीलचे युद्ध असेल किंवा 1965 सालचे युद्ध असो किंवा 1971 सालचे युद्ध असो भारताने पाकिस्ताला धूळ चारलेली आहे. यावेळीही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानाला धूळ चारलेली आहे. पाकिस्तानने भारताकडे नजर वाकडी करून पाहिलं तर भारत ते डोळेच काढून घेईल, हेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दाखवून दिलंय, असं ठाकूरन यांनी ठणकावून सांगितलं.

तर प्रेतावर रडायलाही कोणी शिल्लक राहणार नाही- अनुराग ठाकूर

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलंय. पाकिस्तानच्या हवाई तळांना ध्वस्त करण्यात आलं. पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांनाही ध्वस्त करण्यात आलं. पाकिस्तानला चीत करण्याचं काम भारताने केलं आहे. पाकिस्तानला मी सांगू इच्छितोय की आगामी काळात एखाद्या दहशतवाद्याने भारतावर हल्ला केला तर त्या दहशतवाद्यांचं प्रेत उचलायला आणि प्रेतावर रडणारंही कोणी शिल्लक राहणार नाही, असा इशारीही ठाकूर यांनी पाकिस्तानला दिला.