
पृथ्वीवरील नंदनवन म्हटले जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाव येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निष्पाप पर्यटकांवर २२ एप्रिल २०२५ रोजीच्या सकाळी काही पाकपुरस्कृत बंदूकधाऱ्यांनी हल्ला करीत २६ जणांना ठार केले आणि अवघा देश सुन्न झाला. त्यानंतर सरकारवर दबाव वाढला आणि प्रत्युत्तराची कारवाई झाली. भारताचे उत्तर एखाद्या काव्यगत न्यायाप्रमाणे केवळ आपल्याला कळून उपयोग नव्हता. तर तो सूड घेतला गेला हे जगाला दिसणे महत्वाचे होते. हा कठीण धडा आपल्याला साल २०१९ च्या पुलवामा हल्लाच्या वेळी मिळाला होता. पुलवामानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमधील अतिरेकी अड्ड्यांवर हल्ल्याच्या समर्थनार्थ आपण काही फोटो जारी केले होते…. पाकिस्तानने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले. आणि ऑपरेशनच्या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरही संशय घेतला गेला. सहा वर्षांनंतर ७ मे रोजी भारतीय सशस्र दलाने असा कोणताही संशय राहू नये याची पुरेपुर काळजी घेतली. २२ एप्रिलच्या पहलगामच्या नृशंस हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील ९ अतिरेकी स्थळांना टार्गेट करण्यात आले. या...