मोठी बातमी! भारताचा बाबर आझम, शाहीन आफ्रिदीला मोठा दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंविरोधात मोठी कारवाई केली आहे.

मोठी बातमी! भारताचा बाबर आझम, शाहीन आफ्रिदीला मोठा दणका, केली ही मोठी कारवाई
babar azam and shaheen afridi
| Updated on: May 02, 2025 | 4:53 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर मोठे निर्णय घेतले आहेत. नुकतेच भारताने पाकिस्तानमधील काही यूट्यूब चॅनेल्स बंद केले होते. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानी क्रिकेटर्सना मोठा दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंविरोधात एक मोठी कारवाई केली आहे.

भारताने नेमकी काय कारवाई केली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानचे क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी तसेच मोहोम्मद रिझवान या तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या खेळाडूंची इन्स्टाग्राम खाती भारतात बंद करण्यात आली आहेत. या तिन्ही खेळाडूंना भारतातील अनेक लोक फॉलो करतात. आता मात्र भारताच्या या निर्णयानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यांचा रिच कमी होणार आहे.

याआधी पाकिस्तानचे यूट्यूब चॅनेल्स बंद

भारताने याआधी पाकिस्तानमधील एकूण 16 यूट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जेओ न्यूज यासारखी यूट्यूब चॅनेल्स भारताने बंद केली आहेत. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरचेही यूट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांचेही यूट्यूब चॅनेल बंद

भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचेही यूट्यूब चॅनेल भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारताने थेट पाकिस्तानी पंतप्रधानाविरोधातही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.

पाकिस्तानी अभिनेते, अभिनेत्रींचे इन्स्टाग्राम खाते बॅन

भारताने पाकिस्तानातील काही अभिनेते आणि अभिनेत्रींची इन्स्टाग्राम खातीही भारतात बंद केली आहेत. यात भारतात जिचे लाखो फॅन्स आहेत, त्या हानिया आमीरचाही समावेश आहे. भारताचा मेगास्टार शाहरुख खानसोबत रईस या चित्रपटात काम केलेल्या माहिरा खान हिचेही इन्साटाग्राम खाते भारतात बंद करण्यात आले आहे. यासह सनम सईद, अली जफर यांचेही इन्साटाग्राम खाते भारतात बॅन करण्यात आले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. भारताकडून पाकिस्तानची सर्वच पातळीवर कोंडी करण्यात येत आहे. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून भारताविरोधात काही निर्णय घेतले आहेत.