हाशिम मूसा म्हणजे दुसरा कसाबच! ‘पहलगाम’च्या मास्टरमाईंडचा पाकिस्तानशी ‘असा’ संबंध, धक्कादायक माहिती समोर!

आता पहलगाम हल्ल्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसा असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे याच हाशिम मूसाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय.

हाशिम मूसा म्हणजे दुसरा कसाबच! पहलगामच्या मास्टरमाईंडचा पाकिस्तानशी असा संबंध, धक्कादायक माहिती समोर!
pahalgam terror attack
| Updated on: Apr 29, 2025 | 7:06 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी मोठे पाच निर्णय घेतले आहेत. या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. याचाच परिपाक म्हणून स्थितीत दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत. दरम्यान, आता पहलगाम हल्ल्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसा असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे याच हाशिम मूसाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय.

हाशिम मूसा पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड

भारतीय सेनेकडून पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून कसून शोध घेतला जात आहे. भारताने हा हल्ला करणाऱ्यांची सर्व कुंडली काढली आहे. या दहशतवाद्यांची नावंही समोर आली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा हाशिम मूसा आहे. तो अजूनही कुठेतरी लपून बसलेला असून भारतीय सेने त्याचा कसून शोध घेत आहे. मूसा हा अगदी कसलेला दहशतवादी असल्याचंस सांगितलं जातंय.

हाशिम मूसा आणि पाकिस्तानचा संबंध काय?

मिळालेल्या माहितीनुसार हाशिम मूसा हा पाकिस्तानी सेनेतील स्पेशल फोर्समधील माजी पॅरा कमांडो आहे. याच कारणामुळे लपून बसण्याचे डावपेच त्याला माहिती आहेत. पाकिस्तानी सेनेत असताना त्याला चांगल्या पद्धतीने ट्रेन करण्यात आल्यामुळेच त्याने पहलगामचा हल्ला घडवून आणला तसेच गायबही झाला.

हाशिम मूसा म्हणजे दुसरा कसाब

याच हाशिम मूसाची मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबशी तुलना केली जात आहे. 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला जिंवत पकडलं होतं. त्याला जिवंत पकडल्यानंतर लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे अनेक कृष्णकृत्य समोर आले होते. आता पहलगाम हल्ल्यातील हाशिम मूसा याची तुलना कसाबशी केली जात आहे. कारण त्याला मिळालेले प्रशिक्षण हे कसाबप्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे. हा मूसा सेनेच्या हाती लागल्यास त्याच्याकडून अनेक स्फोटक माहिती मिळू शकते. त्यामुळे पाकिस्तानला उघडं पाडण्यासाठी तो तो कसाबप्रमाणेच एक मोठं शस्त्र ठरू शकतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हाशिम मूसा याचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळालेले आहेत. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, भारताने पाकिस्तानविरोधात काही निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.