Pahalgam Terrorist Attack : ‘आक्रमण’, राफेल-सुखोईची एकाचवेळी मोठी गर्जना, पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये

Pahalgam Terrorist Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या 48 तासांपासून इंडियन एअरफोर्स हाय-अलर्टवर आहे. काश्मीरच्या आकाशात एकाचवेळी राफेल-सुखोईची गर्जना झाली. पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये आला आहे.

Pahalgam Terrorist Attack : आक्रमण, राफेल-सुखोईची एकाचवेळी मोठी गर्जना, पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये
rafale
Image Credit source: Patrick Aventurier/Getty Images
| Updated on: Apr 25, 2025 | 9:15 AM

इंडियन एअर फोर्सच्या ‘आक्रमण’ने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. राफेल आणि सुखोई-30 च्या वॉरड्रीलने पाकिस्तान टेन्शनमध्ये आला आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 48 तासापासून इंडियन एअरफोर्स हाय अलर्टवर आहे. युद्धाच्या तयारीसाठी IAF ने सेंट्रल सेक्टरमध्ये युद्धाभ्यास केला. एअरफोर्सने या युद्धसरावाला ‘आक्रमण’ नाव दिलं आहे. या युद्धभ्यासात टॉप गन पायलट सहभागी झाले होते. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वेगवेगळ्या एअर बेसवर भारतीय वायूसेनेची विमानं तैनात आहेत. ‘आक्रमण’ वॉर ड्रिलसाठी वेगवेळ्या एअरबेसवरुन या फायटर जेट्सनी एकाचवेळी उड्डाण केलं. आकाशातून जमिनीवर हल्ला करण्याची ड्रील करण्यात आली. हाशिमारा आणि अंबाला येथे राफेलची स्क्क्वाड्रन्स तैनात आहेत. तिथून या विमानांनी उड्डाण केलं. भारतीय एअर डिफेन्स युनिट फ्रंटलाइनवर तैनात आहे. हा रुटीन सराव असल्याच इंडियन एअरफोर्सकडून सांगण्यात आलं.

पायलटने अत्यंत कमी कालावधीत मोठ्या मिशनवर कसं काम करायचं हा या वॉरड्रीलमागे उद्देश होता. यात अत्याधुनिक फायटर जेट्सनी सराव करण्यात आला. असं म्हटलं जातय की, आधीपासूनच या युद्धभ्यासाची प्लानिंग होती. भले ही रेग्युलर एक्सरसाइज असली, तरी याच टायमिंग बरच काही सांगून जातं. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झालाय, त्याता असा युद्धाभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो.

ही एक लॉन्ग रेंज ड्रील होती

या युद्ध सरावात राफेल आणि सुखोई फायटर जेट्सशिवाय मिराज, एस-4 सारखी विमानं सुद्धा सहभागी झाली होती. राफेल हे 4.5 जनरेशनच एअरक्राफ्ट आहे. शत्रूच्या बंकरला उद्धवस्त करण्याची या विमानाची क्षमता आहे. त्यांचे रणगाडे उडवू शकतो. शत्रू कुठे लपला असेल, तर तिथे हल्ला करण्याची या विमानाची क्षमता आहे. ही एक लॉन्ग रेंज ड्रील होती. राफेल आणि सुखोई- MKI 30 ही भारताची दोन मुख्य फायटर विमानं आहेत. राफेल हे फ्रेंच बनावटीच तर सुखोई हे रशियन बनावटीच विमान आहे.