
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारताने कायदेशीर स्ट्राईक केली आहे. सिंधू पाणी करार रद्द केला आहे. तर समाज माध्यमांवर लोकप्रिय असलेले शिक्षक, खान सरांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यासाठी एक जबरदस्त योजना सांगितला आहे. सिंधू पाणी करार तोडणे अथवा सर्जिकल स्ट्राईक हा उपाय नाही. पण या एका उपायाने पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी जाईल असा दावा खान सरांनी केला आहे.
हा प्रभावी उपाय नाही
खान सरांचे युट्यूब चॅनल हा अनेकांसाठी ज्ञानाचा स्त्रोत आहे. या चॅनलवर खान सरांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक खास योजना सांगितली आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. खान सरांनी सिंधू पाणी करार रद्द करणे अथवा सर्जिकल स्ट्राईक हे प्रभावी उपाय नसल्याचे म्हटले आहे. पाणी वळवून आपण कुठे आणणार, असा सवाल खान सरांनी केला आहे.
खान सरांच्या मते सध्या सिंधू नदी पात्रात बांध घाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह बंद होईल. पाकिस्तानच्या भागातील लोक पाण्यासाठी वणवण भटकतील. कडक उन्हाळ्यात त्यांना धडा बसेल. जेव्हा हा बांध पूर्णपणे पाण्याने भरेल. तेव्हा तो अचानक सोडून द्या. त्यामुळे पाकिस्तानाला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळेल.
Khan sir is absolutely right it’s time for action. India must consider #NavalBlockageForPakistan to cut off Pakistan supply. We all need to stand united against Pakistan and terrorism. #pahalgamattack #navalblockage pic.twitter.com/ic2TnxcR9k
— Explorer Vikram (@Vikramjangid99) April 24, 2025
खान सरांचा तो उपाय काय?
हिंदी महासागरात भारताचा धाक आहे. हा धाक भारताने अजून वाढवावा. इराणच्या चाबहार बंदरापर्यंत भारताने गस्त वाढवावी. भारतीय युद्ध नोका तिथपर्यंत घेऊन जाव्यात. पाकिस्तानची समुद्रात कोंडी करावी. समुद्रामार्गे पाकिस्तानचा जो व्यापार होतो. तो पूर्णपणे बंद करावा. एकीकडे सिंधू नदीचे पाणी थांबवणे आणि दुसरीकडे नेव्हल ब्लॉकेज करुन पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळ करणे हा मोठा प्रभावी उपाय असल्याचे खान सरांचे मत आहे.
खान सरांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांना खान सरांची ही योजना आवडली आहे. अनेकांनी पाकिस्तानची सर्व प्रकारची नाकाबंदी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला पुढील अनेक वर्षे धडा बसेल असे उपाय करणे आवश्यक असल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया, कमेंट या व्हिडिओवर येत आहे. आर्थिक रसद तोडली तर पाकिस्तान बेचिराख होईल असे लोकांचे म्हणणे आहे.