
पाकिस्तानमधील समाजकंटकांनी अनेक हिंदू मंदिरात तोडफोड केली. भारतात देखील असं एक मंदिर आहे, ज्यावर पाकिस्तानने हजारो बॉम्ब हल्ले केले, पण मंदिराचा दगड देखील हलला नाही. भारत-पाकिस्तान सीमेजवळ मातेचं एक मंदिर आहे जे तनोट माता मंदिर म्हणून ओळखलं जातं. ते राजस्थानमधील जैसलमेरपासून अंदाजे 120 किमी अंतरावर आहे.
1965-1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान येथे उपस्थित असलेल्या देवीने भारतीय सैनिकांचं रक्षण केलं होतं अशी देखील मान्यता आहे. हे मंदिर 12 व्या शतकात जैसलमेरचे भाटी राजपूत शासक महारावल लोणकावत यांनी बांधलं होतं.
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, मंदिराजवळ उपस्थित असलेल्या भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी अनेक बॉम्ब टाकण्यात आले. मंदिराभोवती हजारो गोळे डागण्यात आले पण एकही बॉम्ब योग्य लक्ष्यावर लागला नाही. असं म्हणतात ही, बॉम्ब मंदिर परिसरात पडले पण एकही बॉम्ब फुला नाही. शिवाय जवान आणि मंदिराला काहीही झालं नाही.
अशा परिस्थितीत, भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलं आणि देवीच्या आशीर्वादाने विजय मिळवला. हे मंदिर युद्धदेवतेचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराच्या संग्रहालयात पाकिस्तानने डागलेले जिवंत बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या भागात आजही बॉम्ब दिसतात. मंदिर परिसरात एक विजय स्मारक देखील बांधण्यात आलं आहे.
युद्धानंतर बीएसएफने मंदिराच्या पूजा आणि प्रार्थनेची जबाबदारी घेतली. मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन, बी.एस.एफ. ने येथे आपली चौकी स्थापन केली आहे. 1965 च्या युद्धादरम्यान, देवीच्या चमत्कारांनी प्रभावित झालेले पाकिस्तानी ब्रिगेडियर शाहनवाज खान यांनी भारत सरकारकडे मंदिरात येऊन दर्शन घेण्यासाठी परवानगी मागितली.
अनेक अडचणींनंतर, भारत सरकारकडून परवानगी मिळाल्यावर, ब्रिगेडियर खान यांनी केवळ देवीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं नाही तर मंदिरात चांदीचं छत्रही अर्पण केलं.