Pakistani Beauty Cream : मार्केटमध्ये बॅन तरी पाकिस्तानच्या विषारी क्रीमची भारतात खुलेआम विक्री, एकच खळबळ!

महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये या क्रीमची खुलेआम विक्री केली जातेय. काही ई-प्लॅटफॉर्म्सवरही या क्रीमची विक्री होत असून तिची किंमत 380 ते 800 रुपये सांगितली जातेय.

Pakistani Beauty Cream : मार्केटमध्ये बॅन तरी पाकिस्तानच्या विषारी क्रीमची भारतात खुलेआम विक्री, एकच खळबळ!
pakistani beauty cream goree
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 9:03 PM

Pakistan Beauty Cream : पाकिस्तानातील ‘गोरी ब्यूटी क्रीम’ ही भारतात बॅन आहे. या क्रीमची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु तरीदेखील या क्रीमची खुलेआम विक्री केली जात असल्याची गंभीर बाब समोर आलीय. दिवाळीच्या काळातही या क्रीमची खुलेआम विक्री केली जातेय. त्यामुळे आता पुन्हा एकदा या क्रीमच्या विक्रीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

पाकिस्तानची ही क्रीम किती धोकादायक?

‘गोरी ब्यूटी क्रीम’मुळे त्वचा गोरी होते, असा दावा केला जातो. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे या क्रीममध्ये पाऱ्याचे तसेच लीडचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. नियमानुसार एखाद्या क्रीममध्ये पारा या धातूचे प्रमाण हे 1 PPM असणे गरजेचे आहे. परंतु या क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण हे 5 PPM आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार पारा मानवी शरीरात प्रवेश करतो. त्याचा शरीरातील मेलॅनीन निर्मितीवर परिणाम होतो आणि त्वचा उजळ दिसायला लागते. परंतु यामुळे शरीरात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Loading...

क्रीमची किंमत 380 ते 800 रुपये

महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये या क्रीमची खुलेआम विक्री केली जातेय. काही ई-प्लॅटफॉर्म्सवरही या क्रीमची विक्री होत असून तिची किंमत 380 ते 800 रुपये सांगितली जातेय. पाकिस्तानातील कोणतेही प्रोडक्ट भारतात आणण्यास सध्या बंदी आहे. भारत-पाकिस्तान व्यापरही बंद आहे. तरीदेखील ही क्रीम विक्रीस उपलब्ध झाल्याने याबाबतचा तपास केला जातोय.

परदेशातही त्या ब्रँडच्या उत्पादनांवर बंदी

दरम्यान, एका रिपोर्टनुसार या क्रीमच्या वापरामुळे 18 महिलांना मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी असल्याचे समोर आले. म्हणूनच या क्रीमवर बंदी घालण्यात आली. या क्रीमच्या ब्रँडशी संबंधित उत्पादनांवर परदेशातही कारवाई झालेली आहे. न्यूझिलंडच्या मेडिसिन रेग्यूलेटर मेडसेफ या संस्थेने गोरीच्या काही उत्पादनांवर बंदी घातलेली आहे. फिलिपिन्सच्या FDA नेदेखील 2025 साली या ब्रँडच्या काही उत्पादनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, आता या कंपनीची ब्यूटी क्रीम विकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us