Video: युद्ध हारलं तर मी ‘हे’ कपडे घालेन जेणेकरुन दुश्मनाला वाटेल…; पाकिस्तान इन्फ्लूएंसरचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी महिला इन्फ्लूएंसरने एक असे रील बनवले आहे जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना दिसत आहे. ज्यात तिने अप्रत्यक्षपणे भारताच्या विजयाचा इशारा दिला होता.

Video: युद्ध हारलं तर मी हे कपडे घालेन जेणेकरुन दुश्मनाला वाटेल...; पाकिस्तान इन्फ्लूएंसरचा व्हिडीओ व्हायरल
Indian And Pakistan
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 01, 2025 | 2:07 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण खराब झालं आहे. अशा परिस्थितीत, जिथे बहुतेक भारतीय युद्धासारख्या गोष्टींबद्दल अत्यंत समजूतदारपणे बोलताना दिसत आहेत, तिथे पाकिस्तानातील काही प्रभावशाली व्यक्ती आपल्या देशाच्या पराभवावर आधारित कंटेन्ट तयार करण्यात व्यस्त आहेत. एका पाकिस्तानी महिला इन्फ्लूएंसरने असेच एक रील बनवले आहे, ज्यामुळे आता भारतीयही तिची मजा घेत आहेत.

महिलेने यावर रील बनवला की जर भारत जिंकला, तर ती काय परिधान करेल आणि जर पाकिस्तान हरला, तर ती भारतात येण्यासाठी कोणत्या गोष्टी शिकेल. साहजिकच, असा मजकूर तयार केल्यावर भारतात व्हायरल होणारच होता. त्यामुळे आता लोक यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत.

वाचा: पाकिस्तानात अशांतीच अशांती! भारताशी युद्ध झालं तर काय होईल परिणाम? ISI प्रमुखांनी केली पोल

पाकिस्तान हरला तर मी हे परिधान करेन!

या व्हिडिओमध्ये इन्फ्लूएंसर सांगता आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती खूप खराब होत आहे, त्यामुळे लोक मला विचारत होते की तुम्ही युद्धाच्या वेळी काय परिधान कराल.’ क्लिपमध्ये ती म्हणते की युद्धाच्या वेळी ती झाडे-झुडुपांसारखा ड्रेस घालेल, जेणेकरून ती झुडपांमध्ये चांगली लपून राहू शकेल. त्यानंतरही शत्रूला कळू नये म्हणून मी फूल असल्याचे दाखवेल. मी फुलांचा परफ्यूम मारेन.

क्लिपमध्ये पुढे ती सांगते की जर पाकिस्तान हरला, तर मी हा काळा ड्रेस घालेन. कारण मग ना पाणी मिळेल, ना इज्जत. त्यामुळे शत्रू माझी अवस्था पाहून माला सोडून देईल. ती पुढे सांगते की मी भारतातील कामांची सरावही सुरू केला आहे. रीलच्या शेवटी ती सांगते की जर पाकिस्तान जिंकला, तर ती पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालेल… सुमारे 38 सेकंदांची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

X वर @yesimbackonline नावाच्या वापरकर्त्याने व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं- पाकिस्तानी इन्फ्लूएंसर युद्धावर असा रील बनवत आहेत? आतापर्यंत या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि साडेपाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर पोस्टवर अडीचशेहून अधिक कमेंट्स आले आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

पाकिस्तानी इन्फ्लूएंसरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतीयही म्हणत आहेत की या पाकिस्तान्यांना गंभीर मानसिक विकार झाला आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याने सांगितलं की 7 दशलक्ष व्ह्यूज नंतर हा रील काढून टाकण्यात आला कारण तो भारतात पोहोचला होता. एका वापरकर्त्याने लिहिलं- हा संपूर्ण देश गंभीर मानसिक विकाराने ग्रस्त आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं की, भाऊ, त्यांच्याकडे इन्फ्लूएंसरही आहेत.