
Pariksha Pe Charcha 2026 PM Narendra Modi Advice: देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी 4.50 कोटीहून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC) 2026 जोडल्या गेले आहेत. आज राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी परीक्षेसाठी अभ्यास कसा करू, ते परीक्षेचा ताण कसा कमी करू आणि इतर मनातील प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं दिलीच. पण त्यांना कानमंत्रही दिला.
आसामचा गमछा भेट
पीएम मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत हे आसामचा गमछा देत करण्यात आले. आसामचा गमछा हा या राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्याला प्रतिष्ठा आहे. हा गमछा खासकरून आसाममधील सर्वात मोठा क्षण बिहू सणावेळी गळ्यात घालण्यात येतो. त्याला बिहुवान असंही म्हटलं जाते. हा गमछा हाताने तयार करण्यात येतो.
परीक्षा पॅटर्न कोणता निवडू?
परीक्षा पॅटर्नविषयी गुजरातची सानवी हिने पीएम मोदी यांना प्रश्न विचारला. शिक्षकांपासून पालकांपर्यंत परीक्षा पॅटर्नविषय प्रत्येकाचं एक मत आहे. त्यामुळे काय करू हे तर मला समजतच नाही.
तिच्या या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. आपण पंतप्रधान झालो, तेव्हा पण वेगवेगळ्या लोकांनी सल्ला दिला होता. तुम्हाला अगोदर परीक्षा पॅटर्न समजून घ्यावं लागेल. कुणाच्या म्हणण्यांनुसार वागू नका. तुमच्या अनुभवावर पॅटर्न ठरवा. त्यानंतर कोणते पॅटर्न चांगले असेल ते ठरवा. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे पॅटर्न प्रत्येक वेळी बदलले. वेगवेगळ्या शहरात जाऊन हा कार्यक्रम घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यासासाठी वापर करू का?
तर बोर्डाची परीक्षा अथवा शाळेतील अंतर्गत परीक्षा, घटक चाचण्यांसाठी गेल्यावर्षीची प्रश्नपत्रिका संच सोडवावा का, कारण त्यातही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. अशावेळी काय करावे, असा सवाल एकाने विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही वृत्तपत्रात वाचलं असेल की यंदा पेपर, परीक्षा फार अवघड होती. शिक्षकही मागील 10 वर्षांचे प्रश्नसंच पाहा असा सल्ला देतात. माझ्यावेळी पण असंच सांगण्यात येत होत की, मागील प्रश्नपत्रिका पाहायला हव्यात, सोडवायला हव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेवर लक्ष देणं थोडं अवघड होतं. ते आगामी परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात कमी पडतात. ते मागील अनेक वर्षांच्या प्रश्नातच गुंतून पडतात. हा एक आजारासारखा प्रकार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जीवनात सर्वात उत्तम व्हा. त्यासाठी प्रयत्न करा. शिक्षण हे एक माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. अभ्यासात संतुलन ठेवावे लागले असा मंत्र पंतप्रधानांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परीक्षेसाठी टॉप 5 ‘कानमंत्र’
1. परीक्षा उत्सवासारखी साजरा करा, तणाव घेऊ नका, अभ्यास करा
2.स्पर्धा ही तुमची, तुमच्याशीच आहे, दुसर्याशी नाही
3.डिजिटल फास्टिंग, या काळात मोबाईल, लॅपटॉप, सोशल मीडियापासून दूर राहा
4.जे अवघड वाटतं, कठीण वाटतं ते अगोदर करा
5.परीक्षा योद्धा व्हा, घोकंपट्टी करणारा होऊ नका