
एक अतिशय धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात (RWSS) काम करणाऱ्या एका अभियंत्याने शिपायाला पाणी देण्यास सांगितले. यानंतर या शिपायाने थेट लघवी पिण्यास दिली. ज्यानंतर त्या अभियंत्याची तब्येत बिघडली आणि त्यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे शिपायाला म्हटले असून हे सर्व प्रकरण थेट पोलिस ठाण्यात जाऊन पोहोचले आहे.
लघवीचे पाणी पिल्याने खालावली अभियंत्याची तब्येत
शिपायाला म्हटले की, मी साहेबांना स्वच्छ पाणीच प्यायला दिले होते. याबाबत अभियंत्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या प्रकरणात कारवाई देखील केली आहे. अभियंत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 23 जुलैला डिनर केल्यानंतर मी शिपाई सिबा नारायण नायक याला पाणी मागितले होते. अभियंत्याचे नाव सचिन गौडा असून त्यांनी मोठा आरोप केलाय.
बाटलीमधील पाणी तपासणीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
सचिन गौडा यांनी म्हटले की, त्या शिपायाने त्यांना एक स्टीलची बाटली दिली आणि ती पिण्याचे पाणी असल्याचे सांगितले. नंतर त्यात लघवी असल्याचा संशय आला. इतर दोन कर्मचाऱ्यांनीही त्याच बाटलीतून पाणी प्यायले आणि त्यांनीही पाण्याचा दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. पाण्याची चवही पूर्णपणे वेगळी होती. त्यातून खूप वास येत होता. म्हणून त्यांनी उरलेले पाणी/लघवी जपून ठेवली.
अभियंत्यावर सुरू आहेत रूग्णालयात उपचार
दुसऱ्या दिवशी अभियंता खूप जास्त आजारी पडले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस स्टेशनला जात तक्रार दिली. सध्या सचिन गाैडा यांच्यावर उपचार सुरू असल्याचीही माहिती मिळतंय. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. बाटलीमधील पाणी तपासासाठी पाठव्यात आलंय. पाण्याच्या रिपोर्टनंतरच नेमकं काय घडलं, याबद्दल खुलासा हा केला जाऊ शकतो. मात्र, या घटनेनं विविध चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. शिपायाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले आहेत.