जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी, युद्धाच्या भडक्यात PM मोदींचा 8 देशांच्या नेत्यांना फोन; काय झाली खलबतं?

War Update : इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्यासह 8 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे.

जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी, युद्धाच्या भडक्यात PM मोदींचा 8 देशांच्या नेत्यांना फोन; काय झाली खलबतं?
PM Modi Call 8 World Leaders
Image Credit source: Google
| Updated on: Mar 03, 2026 | 6:52 PM

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणमधील अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहेत. इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या आखाती देशांमध्ये भारतीय लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्यासह 8 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंतप्रधान मोदींनी युएई, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या प्रमुखांशी फोनवरून संवाद साधला आहे. यात मोदींनी शांतता राखण्याचे, संवादातून तोडगा काढण्याचे आणि भारतीयांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली.

8 आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा करताना सतत होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी पंतप्रधान मोदींनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबा अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आखाती देशांनी सुरक्षेबाबत कडक निर्णय घेतले आहेत. ड्रोन हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील फुजैराह ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये आग लागली आहे. फुजैराहमध्ये काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. बंदर बोगद्यापासून व्हिलेज ब्रिजपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे कारण या भागात ड्रोनचे अवशेष आढळले आहेत.

ड्रोनच्या उड्डाणांवर बंदी

दुसरीकडे, ओमाननेही आपल्या हवाई क्षेत्रात सुरक्षा कडक केली आहे. देशाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ड्रोनच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. हा निर्णय आज जाहीर करण्यात आला. या आदेशात सरकारी, व्यावसायिक आणि मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ड्रोन उडवण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. तसेच पॅराग्लायडिंग, पॅरामोटर आणि इतर हवाई खेळांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us