PM मोदींच्या Gen Z स्टाईल व्हिडिओची कमाल, रातोरात वाढले 1 मिलियन फॉलोअर्स

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

PM मोदींच्या Gen Z स्टाईल व्हिडिओची कमाल, रातोरात वाढले 1 मिलियन फॉलोअर्स
PM Modi Insta Followers Gain
Image Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 10:15 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ

रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की, ‘पेपरफुटी प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद आणि फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करणाऱ्या कायद्याच्या मसुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच मांडले जाईल. या विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल नंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ते मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाऊ शकते.’

पीएम मोदींचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताच तो प्रचंड व्हायरल झाला. 24 तासही पूर्ण झाले नसताना या व्हिडिओला सुमारे 28 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर पीएम मोदींच्या फॉलोअर्समध्ये 10 लाखांची वाढ झाली आहे. IANS च्या वृत्तानुसार, केवळ 12 तासांत त्यांच्या फॉलोअर्समध्ये 10 लाखांची (1 मिलियन) भर पडली. व्हिडिओ अपलोड करताना त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 101 मिलियन (10.1 कोटी) फॉलोअर्स होते. काही तासांतच ही संख्या 102 मिलियन (10.2 कोटी) झाली आहे.

मंत्र्यांनाही दिला इन्स्टाग्रामवर सक्रिय राहण्याचा सल्ला

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या सहकारी मंत्र्यांनाही इन्स्टाग्राम रील्स आणि इंटरॅक्टिव्ह सत्रांच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की,’तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. नागरिकांचा हा एक महत्त्वाचा वर्ग आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्याशी जोडले जाणे आवश्यक आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us