Kashi Vishwanath Corridor: काशीत आज दिवाळी, मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण, काय काय तयारी?

उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे.

Kashi Vishwanath Corridor: काशीत आज दिवाळी, मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण, काय काय तयारी?
Kashi Vishwanath Corridor
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 7:00 AM

वाराणासी: उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पाहुणे काशीत येणार असल्याने देवालये, कुंड, गंगा घाट आदीची साफसफाईही करण्यात आली आहे. तसेच या परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे काशी शहर उजळून निघालं आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर काशीतील प्रत्येक घरात प्रसाद आणि एक पुस्तक दिलं जाणार आहे. एवढी जय्यत तयारी योगी प्रशासनाने केली आहे.

Kashi Vishwanath Corridor

श्री काशी विश्वनाथ धाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्याचच उद्या लोकार्पण होणार आहे. आज 13 डिसेंबर रोजी मोदी आपल्या मतदारसंघात येतील. त्यानंतर श्री विश्वानाथ धामचं लोकार्पण करतील. संपूर्ण जगानेही या सोहळ्याची दखल घ्यावी यासाठी योगी प्रशासन कामाला लागलं आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. शेकडो वर्षानंतर श्री काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार होत आहे. त्यासाठी भव्य लोकार्पण सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. शेकडो वर्ष लोकांच्या स्मरणात राहील असाच हा सोहळा होणार आहे, असं वाराणासीचे मंडळ आयुक्त आणि श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या कार्यपालक समितीचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितलं.

Kashi Vishwanath Corridor

घरांवर विद्यूत रोषणाई करा, दिवे लावा

लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफ सफाईचं काम पूर्ण जालं आहे. गंगा घाट आणि कुंडांची साफ सफाई आणि रंगरंगोटी झाली आहे. गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर 11 लाख दिवे लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय सरकारी कार्यालये, भवनं, खासगी इमारतींवर विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांनाही आकर्षकरित्या सजवण्यात येत आहे. या ठिकाणी भजन संध्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनीही घराघरावर विद्यूत रोषणाई करावी, घरात दिवे लावावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Kashi Vishwanath Corridor

प्रसाद आणि पुस्तकाचं वाटप

हा सोहळा अधिक चांगला होण्यासाठी एका स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं आहे. या स्पर्धेत पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्यांना 51, 21 आणि 11 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक वॉर्डात मंडळांनी पहाटे कीर्तन आणि भजन सुरू केलं आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर 13 ते 16 डिसेंबर दरम्यान श्री काशी विश्वनाथ न्यासाच्यावतीने बाबाचा प्रसाद आणि पुस्तक प्रत्येक घरात देण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या:

Breaking: पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भात खोडसळ घोषणा, फॉरवर्ड करु नका

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास, काशी विश्वनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा कायापालट, उद्घाटनाची जय्यत तयारी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?