PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?
पंतप्रधा नरेंद्र मोदी, अयोध्या मंदिर भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वीच्या सरकारनं मंदिरांच्या जिर्णोद्धाराबाबत आपली इच्छाशक्ती दाखवली नाही. इतकंच नाही तर पूर्वीच्या सरकारमुळे देशाच्या अध्यात्मिक गौरवाला ठेस पोहोचली, इतकंच नाही तर मागील दशकांमध्ये मंदिरांच्या पतनात त्या सरकारांचं योगदान राहिलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 11, 2021 | 6:42 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गुजराज (Gujrat) राज्याचे प्रमुख आणि केंद्रातील प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. गुजरात राज्याचे प्रमुख आणि केंद्रातील प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरु केल्या आणि त्या पूर्णत्वास नेल्या. तसंच मोदींच्या प्रमुख योजनांमध्ये देशातील शेकडो जुन्या मंदिरांच्या पुनरुद्धाराचाही (Redevelopment of old temples) समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वीच्या सरकारनं मंदिरांच्या जिर्णोद्धाराबाबत आपली इच्छाशक्ती दाखवली नाही. इतकंच नाही तर पूर्वीच्या सरकारमुळे देशाच्या अध्यात्मिक गौरवाला ठेस पोहोचली, इतकंच नाही तर मागील दशकांमध्ये मंदिरांच्या पतनात त्या सरकारांचं योगदान राहिलं आहे.

के.एम. मुन्शी यांच्या प्रयत्नांनंतर सोमनाथ मंदिराचा मुद्दा श्रेत्रीय ते राष्ट्रीय आणि पुन्हा हिंदूंच्या गौरवात बदलला. मंदिरांच्या पुननिर्माणाबाबत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सहमत नव्हते, असं सांगितलं जातं. त्यानंतरही सोमनाथ मंदिर पुन्हा बनवण्यास सुरुवात झाली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे पंतप्रधान नेहरू यांच्या मताविरुद्ध जात मंदिराच्या उद्घाटनासाठी पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर कोणत्या मंदिरांचा पुनर्विकास करण्यात आला आणि सध्या त्या मंदिराचं स्टेटस काय आहे पाहूया…

अयोध्या राम मंदिर

9 नोव्हेंबर 2019 रोजी 70 वर्षापासून अधिक काळ चाललेल्या राम जन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर हिंदू समाजाचा अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्ष आणि स्वप्न पूर्ण होत आहे. या निर्णयाचं महत्व हे की, अयोध्येच्या आसपास 105 गावांमधील सूर्यवंशी श्रत्रिय समाजाने आपला 500 वर्षे जूना संकल्प तोडला आहे. रामजन्मभूमीवर नियंत्रण मिळत नाही तोवपर्यंत पगडी आणि पायात चप्पल न घालण्याचा त्यांचा संकल्प होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारनं अयोध्येत एका भव्य राम मंदिरांच्या निर्माणाचं कार्य सुरु केलं. या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये केलं होतं. भाजपने सुरुवातीलाच संपूर्ण अयोध्या एक प्रमुख हिंदू तीर्थ क्षेत्राच्या रुपात स्थापित करण्याची योजना आखली आहे.

Ayodhya Ram Mandir

अयोध्या राम मंदिर

काशी विश्वनाथ कॉरिडॉर

काशी विश्वनाथ मंदिर हे आपली दिव्यता, प्रचंड गर्दी आणि छोट्या, अस्वच्छ गल्ल्यांमुळे ओखळलं जात होतं. महात्मा गांधी यांनी 4 फेब्रुवारी 1916 ला वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर काशीचा दौरा करताना त्याचा उल्लेख केला होता. मोदी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर काशीच्या मुख्य गरजा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करण्यास सुरुवात केली. 8 मार्च 2019 ला पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या पुनर्विकास आणि पुनरुद्धारासाठी आपल्या सर्वात महत्वाकांक्षी योजना काशी विश्वनाथ कॉरिडॉर योजना सुरु केली.

पंतप्रधान मोदी यांचं लक्ष्य हे गंगा नदी आणि काशी विश्वनाथ मंदिरादरम्यान एक सहज संबंध स्थापित करणे हे होतं. कारण, भाविकांना मंदिरात गंगाजल चढवण्यासाठी नदीत स्नान करणे आणि पाणी घेऊन जाणे सोपं व्हावं. मंदिराच्या चारी बाजूला असलेल्या इमारती पाडल्यामुळे कमीत कमी 40 प्राचीन मंदिरं पुन्हा समोर आली. 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याच्या उद्घाटनाची वाट पाहिली जात आहे.

Kashi Vishwanath Temple 1

काशी विश्वनाथ कॉरिडॉर

सोमनाथ मंदिर परिसर

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात आपल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी अनेक योजना आखल्या. पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिर परिसरात एक प्रदर्शनी केंद्र, समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्टचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमनाथ ट्रस्ट सोमनाथ मंदिराची महिना कायम राखणे आणि सुधारण्यासाठी सातत्यानं काम करत आहे.

Somnath Temple

सोमनाथ मंदिर

केदारनाथ धाम

मोदी सरकारने केदारनाथ धामचा पुनर्विकास केला आहे. 2013 मध्ये केदारनाथ परिसरात मोठं नैसर्गिक संकट आलं होतं. या संकटामुळे प्रचंड नुकसान झालेला फक्त मंदिर परिसराचं रुप बदलण्यात आलं आहे. सोबतच मंदिराला त्याची पूर्ण महिमा बहाल करण्यासाठी नवे परिसरही जोडण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केदारनाथ मंदिर परिसराचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, केदारनाथ परिसराचा विकास हे त्यांचं एक स्वप्न होतं. त्यांनी 2013 आणि त्यानंतर 2017 मध्ये आपल्या भाषणात केदारनाथचा पुनर्विकास करण्याचा विचार बोलून दाखवला होता.

Kedarnath Dham

केदारनाथ मंदिर

चार धान योजना

मोदी सरकारने यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार तीर्थस्थळांना जोडणारा एक आधुनिक आणि विस्तृत चार धाम रस्त्याचं नेटवर्क उभं करण्यासाठी मंजूरी देत चार धाम परियोजनेला सुरुवात केली. या योजनेद्वारे देशभरातून येणाऱ्या चार पवित्र स्थानांवर जाण्यासाठी यात्रेकरुंना अनुकूल ठरेल. या योजनेत रस्त्यासोबतच समांतर रेल्वे लाईनचं कामही सुरु आहे. हा रेल्वे मार्ग पवित्र शहर ऋषिकेश ला कर्णप्रयागशी जोडला जाईल. हा रेल्वेमार्ग 2025 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.

Char Dham Pariyojna

चार धाम परियोजना

विदेशातही मंदिरांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान मोदींचा मंदिर निर्माणाचा प्रयत्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही. तर त्यांनी विदेशातही मंदिरांच्या विकास आणि पुनर्विकासात मदत केली आहे. 2019 मध्ये त्यांनी मनामा, बहरीनमध्ये 200 वर्षे जुनं श्री कृष्णाचं मंदिराच्या 4.2 मिलियन डॉलरच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ केला. त्याबरोबरच पंतप्रधानांनी 2018 मध्ये अबू धामीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचा शिलान्यास केला.

Krishna Temple

बहरिनमधील कृष्ण मंदिर

काश्मिरमध्येही मंदिरांचा पुनर्विकास

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनवण्यात आलं. तेव्हापासून सरकारनं श्रीनगर, काश्मीरमध्ये अनेक धार्मिक स्थळांच्या नुतनीकरण्यासाठी काम सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये एकूण 1 हजार 842 हिंदू पूजा स्थळ आहेत ज्यात मंदिर, पवित्र धबधबे, गुहा आणि वृक्षांचा समावेश आहे. 952 मंदिरांपैकी 212 मंदिर सुरु आहेत. तर 740 मंदिरांची अवस्था वाईट आहे. प्रभू श्री रामाला समर्पित पहिलं मंदीर 1835 मध्ये महाराजा गुलाब सिंह यांनी सुरु केलं होतं. दरम्यान काश्मीरमधील ही योजना सुरुवातच्या टप्प्यात आहेत.

इतर बातम्या :

Kashi Vishwanath Corridor: विकासाचा युगारंभ, काळाच्या उदरात गडप होणाऱ्या परंपरांना मोदींकडून संजीवनी

‘लोकसभेत राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारला गेला, मी ही विचारला असता पण ते आपलेच गाववाले’, विनायक राऊतांचा टोला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें