PM Narendra Modi Birthday : हा आहे पीएम मोदींचा फेव्हरेट फोन, ना हॅक करता येत, ना ट्रॅक,ट्रेस, जाणून घ्या त्याची खासियत

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी असं व्यक्तीमत्व आहे, ज्या बद्दल प्रचंड आकर्षण आणि कुतूहल आहे. पीएम मोदी कुठल्या वस्तू वापरतात, त्या बद्दल सुद्धा जनसामान्यांमध्ये एक उत्सुक्ता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या कंपनीचा फोन वापरतात? त्याची खासियत काय? जाणून घ्या.

PM Narendra Modi Birthday : हा आहे पीएम मोदींचा फेव्हरेट फोन, ना हॅक करता येत, ना ट्रॅक,ट्रेस, जाणून घ्या त्याची खासियत
Pm Narendra Modi Phone
| Updated on: Sep 17, 2025 | 11:40 AM

PM Modi असं व्यक्तीमत्व आहे, ज्यांच्याबद्दल नवीन माहिती जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. आज 17 सप्टेंबर PM Narendra Modi यांचा 75 वा जन्मदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात तुम्हाला माहितीय का? बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल. पीएम मोदी कोणता फोन वापरतात? जाणून घेऊया त्या बद्दल.

खासकरुन सरकारी अधिकाऱ्यांसाठी सिक्योर कम्युनिकेशन सर्वात जास्त महत्वपूर्ण आहे. कारण फोन कॉल दरम्यान ते संवेदनशील माहिती परस्परांना शेअर करतात. Airtel च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका ब्लॉगनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिक्योर कम्युनिकेशनसाठी RAX Phone वापरतात.

हा फोन कोणी बनवलाय?

एडवांस सिक्योरिटी फीचर्स आणि एनक्रिप्टिड कम्युनिकेशन सारखी वैशिष्ट्य या फोनमध्ये आहेत. हा फोन सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सने (C-DoT) बनवला आहे. एडवांस फीचर्स असलेल्या या फोनला एनक्रिप्शनसह गोपनीय संचार (सिक्योर कम्युनिकेशन) प्रदान करण्यासाठी डिजाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे हे डिवाइस अत्याधुनिक आणि सुरक्षित आहे. हा फोन हॅक किंवा ट्रॅक करणं जवळपास अशक्य आहे.मिलिट्री फ्रीक्वेंसी बँड्सवर काम करणाऱ्या या फोनमध्ये एन्क्रिप्टेड सिक्योरिटीचे तीन लेयर आहेत,जे वर्चुअली तोड़णं अशक्य आहे.

या फोनची खासियत काय?

फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन : हा फोन ऑपरेट करण्यासाठी फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन आवश्यक आहे. केवळ अधिकृत (ऑथोराइज्ड) यूजरलाच या डिवाइसचा वापर करता यावा, यासाठी ही सिस्टिम आहे.

लाइव पिक्चर वेरिफिकेशन : कॉल दरम्यान फोन कॉल करणाऱ्याचा लाइव्ह फोटो दिसतो. त्यामुळे धोका कमी होतो.

हँडसेट-स्टेज एन्क्रिप्शन : कम्युनिकेशनला हँडसेट स्तरावर एन्क्रिप्ट केलं जातं. त्यामुळे हा फोन टॅप किंवा ट्रॅक करणं कठीण आहे.

सरकारी स्तराची सुरक्षा : RAX फोनवर NTRO आणि DEITY सारख्या एजन्सीकडून लक्ष ठेवलं जातं.

भारत RAX Phone ची किंमत किती : सरकारी अधिकाऱ्यांच्या दृष्टीने भारतात RAX फोनची अचूक किंमत सार्वजनिकरित्या सांगितलेली नाही.