केंद्रीय मंत्र्यांनी 15 डिसेंबरपर्यंत देश सोडू नका, कारण…; PM नरेंद्र मोदींकडून महत्त्वाचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केंद्रीय मंत्र्यांनी हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी 15 डिसेंबरपर्यंत देश सोडू नका, कारण...; PM नरेंद्र मोदींकडून महत्त्वाचे आदेश
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 9:55 AM

संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्रीय मंत्र्यांना 15 डिसेंबरच्या आधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्याआधी कोणीही परदेशात जाऊ नये, अशाही सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मांडण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाची तारीख आणि कालावधी संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समिती निश्चित करणार आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाविषयी चर्चा झाली. सध्या मोदी सरकारला हिवाळी अधिवेशन बोलाण्यास विलंब होत आहे. त्यावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 13 ऑगस्ट रोजी संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती. आता 100 दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्याची जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारंसघ पुनर्रचना विधेयकासाठी हे अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

Loading...

मोदी सरकारकडून मांडण्यात येणारे विधेयक योग्य बहुमत मिळण्याशिवाय अधिवेशनात मंजूर होऊ शकत नाही. लोकसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजे 361 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सभागृहात 543 सदस्यापैकी 3 जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या सभागृहात 540 सदस्य आहेत. एनडीएकडे सध्या 320 खासदार आहेत. त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची देखील गरज लागणार आहे. विरोधी पक्षातील 26 खासदार फुटल्याने राजकीय समीकरणे बदलेली आहेत. आता अधिवेशनात डीएमके आणि शरद पवार गटाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.  सूत्रांनुसार, मतदारसंघ पुनर्रचनेवरून दक्षिण भारतीय राज्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची चिंता दूर करण्यासाठी मोदी सरकार सर्व राज्यांमधील लोकसभा मतदारंसघाची संख्या 50 टक्क्यांनी वाढण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावामुळे 1971 च्या जनगणनेवर आधारित राज्यांमधील लोकसभा मतदारसंघाचे सध्या प्रमाण कायम राहील. परंतु या विषयावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us