पंतप्रधान मोदींनी लस घेताना ‘ती’ चूक टाळली; वाचा मोदींनी नक्की काय केलं?

| Updated on: Apr 08, 2021 | 10:10 AM

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयातच कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला होता. | PM Narendra Modi Covid vaccine

पंतप्रधान मोदींनी लस घेताना ती चूक टाळली; वाचा मोदींनी नक्की काय केलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. आता नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एखादी गोष्ट केली आणि त्याची चर्चा झालीच नाही, असे फार अपवादाने घडते. यावेळीही त्यांची एक कृती अनेकांच्या नजरेतून सुटली नाही. (PM Modi takes 2nd dose of Covid vaccine at AIIMS Delhi)

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयातच कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या फोटोसेशनमध्ये नरेंद्र मोदींचा हसरा चेहरा चर्चेचा विषय ठरला होता. पंतप्रधान मोदी इतरांना मास्क वापरण्याची सूचना करतात. मात्र, फोटोसेशनसाठी मोदींनी स्वत:ही मास्क काढून ठेवल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.

कदाचित हीच गोष्ट ध्यानात ठेवून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा डोस घालताना तोंडावर मास्क घातल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मोदींच्या टीकाकारांना त्यांच्यावर टीका करण्यास कोणताही मुद्दा मिळणार नाही.

लस घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी या लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अॅक्सेस नाही.

संबंधित बातम्या:

VIDEO: आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

‘राजकारणी जाड कातडीचे, जनावरांची सुई वापरणार आहात का?’ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली

(PM Modi takes 2nd dose of Covid vaccine at AIIMS Delhi)