PM Narendra Modi: मोदी यांच्या नावावर किती संपत्ती? जाणून घ्या, घर, दुकान आणि किती शेती

PM Narendra Modi Assets: PMO साईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता किती याचा तपशील देण्यात आला आहे. 31 मार्च 2026 रोजीपर्यंतची ही माहिती आहे. मोदी यांच्या नावावर किती संपत्ती? जाणून घ्या, घर, दुकान आणि किती शेती?

PM Narendra Modi: मोदी यांच्या नावावर किती संपत्ती? जाणून घ्या, घर, दुकान आणि किती शेती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 17, 2026 | 8:17 AM

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित माहिती चर्चेत आहे. पीएम मोदी यांची मालमत्ता, संपत्ती किती आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) याविषयीची माहिती अधिकृतपणे साईटवर प्रसिद्ध केली आहे. या 31 मार्च 2026 रोजीपर्यंतचा हा तपशील आहे. त्यानुसार, मोदी यांच्याकडे एकूण 4,01,60,999 रुपये इतकी संपत्ती आहे. या माहितीत, त्यांच्या नावावर घर, दुकान अथवा शेती नसल्याचे म्हटले आहे. मोदींची जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

पीएम मोदी यांची एकूण संपत्ती किती?

PMO संकेतस्थळानुसार, 31 मार्च 2026 रोजी नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 4,01,60,999 रुपये म्हणजे जवळपास 4.02 कोटी रुपये इतकी आहे. जंगम आणि स्थावर मालमत्तांचा एकत्रित हिशोबानंतर हे मूल्य समोर येते. दस्ताऐवजानुसार, त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही. त्यांच्या एकूण संपत्तीत बँक ठेवी आणि मुदत ठेवींचे प्रमाण अधिका आहे. कागदपत्रांनुसार, SBI च्या गांधीनगर एनएससी शाखेत त्यांच्या खात्यात 3,562 रुपये रक्कम जमा आहे. तर बँक एफडी आणि एमओडीमध्ये 3,79,76,101 रुपये जमा आहेत.

रोख रक्कम आणि सोने किती?

31 मार्च 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार त्यांच्याकडे 34,429 रुपये रोख रक्कम होती. याशिवाय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये NSC मध्ये 10,24,724 रुपये जमा आहेत. त्यांच्या संपत्तीत सोने सुद्धा नमूद आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्यांचे एकूण वजन जवळपास 45 ग्रॅम इतके आहे. त्याची अंदाजे किंमत 4,58,864 रुपये इतकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

घर, दुकान आणि शेती किती?

शेत जमीन : 0

बिगर शेती जमीन: 0

व्यावसायिक जमीन, मालमत्ता: 0

निवासी इमारत, घर, सदनिका : 0

इतर स्थावर मालमत्ता : 0

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे त्यांचा जन्म झाला होता. आज ते 76 वर्षांचे झाले. पीएमओ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2026 रोजीपर्यंत मोदी यांची घोषीत एकूण संपत्ती जवळपास 4.02 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us