PM Narendra Modi: जिथे पंतप्रधान मोदी विकत होते चहा, आता तिथे नवीन दुकान काय? एकच चर्चा

PM Narendra Modi and Vadnagar Tea Stall: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. गुजरातमधील वडनगर रेल्वे स्टेशनवरील त्यांचे चहाचे दुकान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याच ठिकाणी ते लहानपणी वडिलांसोबत चहा विक्री करत होते. आता त्या ठिकाणी काय आहे?

PM Narendra Modi: जिथे पंतप्रधान मोदी विकत होते चहा, आता तिथे नवीन दुकान काय? एकच चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, टी स्टॉल
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 17, 2026 | 11:51 AM

PM Narendra Modi Birthday: 17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक जुने किस्से आणि जागांची चर्चा होत आहे. यामध्ये गुजरातमधील वडनगर रेल्वे स्टेशनवरील ती चहाची टपरी सुद्धा चर्चेत आली आहे. लहानपण याच ठिकाणी ते लहानपणी वडिलांसोबत चहा विक्री करत होते. हे ठिकाण आजही रेल्वे स्टेशनवर आहे. पण आता तिथे पूर्वीप्रमाणे चहा टपरी नाही. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासानंतर मात्र हा स्टॉल आजही जतन करण्यात आला आहे. आता या दुकानात खरंच चहा मिळतो की तिथे इतर वस्तूंची विक्री होते?

वडनगर स्टेशनवरील अनेक आठवणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बालपण वडनगर येथे गेले. गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात हे रेल्वे स्टेशन येते. या ठिकाणी त्यांचे वडील दामोदरदास चहा विक्री करत होते. अनेक मीडिया वृत्तानुसार, मोदी हे लहाणपणी त्यांच्या वडीलांना मदत करत होते. रेल्वेगाडी आल्यावर ते चहा विकत. यामुळेच वडनगर रेल्वे स्टेशन येथील हे छोटेसे चहाचे दुकान पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील एक मोठी आठवण आहे. इथेच त्यांची जडणघडण झाली.

आता नाही चहाची दुकान

आता काळ उलटला आहे. या रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहराही बदलला आहे. पण हा टी स्टॉल जतन करण्यात आला आहे. त्यात मोठा बदल झालेला नाही. आता या दुकानात चहा मिळत नाही. जुनी चहाची दुकान जतन करण्यात आली आहे. ती जागा पंतप्रधानांची आठवण म्हणून संरक्षित करण्यात आली आहे. 2021 मध्ये वडनगर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास झाला. त्यावेळी हे टी स्टॉल सुरक्षित ठेवण्यात आले होते. काहींच्या मते या ठिकाणाला भेट देण्यासाठी आजही अनेक लोक येतात. पर्यटक येतात. त्यांचे मित्र आणि गावकरी आजही या ठिकाणी जमा होतात.

आज पुन्हा चर्चेत आले ठिकाण

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. ते 76 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे जन्मगाव, जन्म ठिकाण आणि वडनगर रेल्वे स्टेशनवरील चहाची टपरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यासोबतच मोदींचे ज्या ज्या ठिकाणी अधिक काळ वास्तव्य होतं. त्याविषयीच्या आठवण जागवल्या जात आहे. त्यांची चर्चा होत आहे. वडनगर येथे हे ठिकाणी सेल्फी स्पॉट ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us