Narendra Modi | तुमच्यासाठी देशापेक्षा पक्ष मोठा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra modi in parliament | लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विविध मुद्द्यांवरुन चांगलंच सुनावलंय. जाणून घ्या मोदी नक्की काय काय म्हणाले?

Narendra Modi | तुमच्यासाठी देशापेक्षा पक्ष मोठा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
| Updated on: Aug 10, 2023 | 6:03 PM

नवी दिल्ली | लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींनी विरोधीपक्षावर गंभीर आरोप केले. तुम्हाला देशातील तरुणांशी काही घेणं देणं नाही. तुमची बांधिलकी ही सत्तेसोबत आहे, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच मोदींनी विविध विकासकामांबाबतची माहितीही दिली. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तरं देताना नरेंद्र मोदी यांनी ही टीका केली. दरम्यान मोदींनी लोकसभेत एन्ट्री घेताच भाजप-एनडीए खासदारांनी मोदी मोदी अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडला.

मोदी काय म्हणाले?

कई ऐसे बिल थे जो गांव, गरीब, दलित, पिछड़े, आदिवासी के लिए थे, उनके कल्याण, भविष्य के साथ जुड़े हुए थे। लेकिन उनको (विपक्ष) इसकी चिंता नहीं है… विपक्ष के आचरण, व्यवहार से सिद्ध हुआ है कि उनके लिए देश से अधिक दल है, देश से बड़ा दल है, देश से पहले प्राथमिकता दल की है। मैं समझता… pic.twitter.com/9ax0O9DVbk

— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2023

” अशी अनेक विधयकं होती ज्याचा थेट संबंध हा ग्रामीण भाग, मागासवर्गीय, दलित आदिवासींच्या भविष्यासह होता. मात्र विरोधकांना त्याची काहीही चिंता नाही.  विरोधीपक्षातील काही पक्षांनी आचरणातून हे दाखवून दिलंय की त्यांच्यासाठी देशापेक्षा मोठा पक्ष आहे. या पक्षांसाठी देशापेक्षा पहिली प्राथमिकता ही पक्ष आहे. तुम्हाला गरिबाच्या भूकेबाबत चिंता नाही. तुमच्या डोक्यात फक्त सत्तेची भूक आहे”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांना सुनावलं.

“तुम्हाला देशातील तरुणांच्या उज्जवल भविष्याची चिंता नाही. तुम्हाला फक्त तुमच्या राजकीय भविष्याची चिंता आहे”, असं म्हणत मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

“एका हिशोबाने विरोधी पक्षाचा अविश्वास हा आमच्यासाठी शुभ असतो. आज मी पाहतोय की विरोधी पक्षाने ठरवलंय की जनतेच्या आशीर्वादाने एनडीए आणि भाजप 2024 निवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजय मिळवेल”, असं मोदींनी नमूद केलं.

“मी 2018 मध्ये म्हटलं होतं की 2023 मध्ये पुन्हा या. पण त्यानंतरही विरोधी पक्षाने मेहनत घेतली नाही. विरोधी पक्षाने देशाला निराशेशिवाय काहीच दिलं नाही. ज्यांची हिशोबाची पुस्तके खराब झाली आहेत ते आमचा हिशोब घेत फिरतायेत”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला.