PM मोदींनी युवकांसाठी घेतला मोठा निर्णय; तरुणांच्या भविष्यासाठी 28000 शहरात महत्वाचं अभियान राबवणार

लाखो युवकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा केली आहे. नशामुक्त भारतासाठी 28000 शहरात अभियान चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

PM मोदींनी युवकांसाठी घेतला मोठा निर्णय; तरुणांच्या भविष्यासाठी 28000 शहरात महत्वाचं अभियान राबवणार
| Updated on: Aug 02, 2026 | 1:07 PM

भारतात सध्या तरुणांच्या समस्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनमुक्तीसाठी मोदी सरकारने महत्वाचं पाऊल उचललं आहे. मोदी सरकारने देशात ‘व्यसनमुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियानाची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदींनीही या कार्यक्रमात सहभाग दाखवला आहे. या कार्यकमात देशभरातील एक कोटींहून अधिक तरुण सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम देशातील 28000 हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. या कार्यक्रमात अनेक मुख्यमंत्री आणि राज्यपालांचाही सहभाग पाहायला मिळेल.

या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन हे 125 हून आध्यात्मिक संस्था, शाळा, महाविद्यालये, संस्था, सार्वजनिक संस्था आणि उद्योग संघटनाच्या सहकार्याने केलं जात आहे. ब्रह्मकुमारी, इस्कॉन, चिन्मय मिशनचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या उद्गघाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘अंमली पदार्थांच्या सवयीपासून दूर राहणे हे कार्यक्रमाचं मुख्य वचन आहे. तरुणांना व्यसन आणि अंमली पदार्थाचं धोके समजायला हवेत. युवकांनी सतर्क राहून व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे’.

या प्रकल्पाची सुरुवात ही काशीमधून झाली. ते म्हणाले, ‘या प्रकल्पाची सुरुवात ही काशी येथून सुरू झाली. त्यामुळे तरुणांना वैज्ञानिक पद्धतीसहीत आध्यात्मिक उर्जा मिळेल. देशातील नागरिकांच्या हितासाठी 125 हून अधिक अध्यात्मिक संघटना सामील होत आहे. सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरविले आहे’.

‘काशीतून ही कल्पना राष्ट्रीय प्रकल्प बनली आहे. आजपासून देशभरात व्यसनमुक्त युवा अभियान सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम केलं जाणार आहे. काही वेळापूर्वी लाखो युवकांनी नशामुक्तीसाठी शपथ घेतली आहे. हा कार्यक्रम 100 आठवडे चालेल, असेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या 100 रविवारी नशामुक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकू, असेही त्यांनी सांगितले.  व्यसनमुक्तीवर भाष्य करताना म्हटलं की, व्यसन आईची स्वप्न उद्ध्वस्त करते. व्यसनामुळे भाऊ-बहीण वेगळे होतात. त्यामुळे तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे, असेही मोदींनी पुढे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us