PM Shree School : आता देशभरात मोदींची शाळा, ‘पीएम श्री स्कूल’ भारतभर विस्तारणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Jun 03, 2022 | 12:50 PM

केंद्र सरकार पीएम श्री स्कूल सुरू करतंय. पीएम श्री शाळा ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा असेल. गुजरातमधील गांधीनगरमध्ये देशभरातील शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

PM Shree School :  आता देशभरात मोदींची शाळा, पीएम श्री स्कूल भारतभर विस्तारणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
शाळकरी विद्यार्थी
Follow us on

मुंबई : नुकतंच मोदी सरकराला आठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काही नव्या योजना सरकारने आणल्या आहेत. यातच आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. देशभरातील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी एक योजना सुरू केली आहे. आता देशभर ‘पीएम श्री स्कूल’ (PM Shree School) सुरू केल्या जाणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील विद्यार्थ्यांना चांगलं भविष्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) परिषदेत ही माहिती दिली. शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील आणि NEP 2020 साठी एक प्रकारची प्रयोगशाळा असेल, असं ते म्हणाले.

‘पीएम श्री स्कूल’ सुरू होणार

देशभरातील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी एक योजना सुरू केली आहे. आता देशभर ‘पीएम श्री स्कूल’ सुरू केल्या जाणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील विद्यार्थ्यांना चांगलं भविष्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) परिषदेत ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकार पीएम श्री स्कूल सुरू करतंय. पीएम श्री शाळा ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा असेल. गुजरातमधील गांधीनगरमध्ये देशभरातील शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. “शालेय शिक्षण हा पाया आहे, ज्यावर देशाची ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था होऊ शकते. 21 व्या शतकातील आपल्या नवीन पिढीचे ज्ञान आणि कौशल्य आपण अधिक समृद्ध केलं पाहिजे. भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. त्याचसाठी पीएम श्री स्कूल स्थापन करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य तयार करणं हा असेल. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेला पीएम श्री स्कूलच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत., असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय.