AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Surya Ghar Yojana:300 यूनिट मोफत वीज, बिलही शून्य, इथं PM सूर्यघर योजनेवर 98,000 रुपयांची सूट

PM Surya Ghar Free Electricity Yojana: नरेंद्र मोदी सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेची सुरुवात केली. या योजनेत आतापर्यंत 50 लाखांहून अधिक घर उजळून निघाल्याचा दावा करण्यात येत आहे.

PM Surya Ghar Yojana:300 यूनिट मोफत वीज, बिलही शून्य, इथं PM सूर्यघर योजनेवर 98,000 रुपयांची सूट
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना
| Updated on: Oct 01, 2026 | 2:11 PM
Share

केंद्र सरकारने पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. त्याच्या लाभार्थ्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवाबत्ती, पंखा, एसी, कुलर, फ्रीज असो वा दुचाकी इलेक्ट्रिक वाहन, इतर इलेक्ट्रिक वस्तू वापरूनही वीज बिलाचा आकडा शून्य येत असल्याने आणि केवळ मीटरचे भाडे द्यावे लागत असल्याने ग्राहकाला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेतंर्गत 300 यूनिट वीज पूर्णपणे मोफत देण्यात येते. यासह Solar Panel लावल्यावर सरकारकडून सबसिडी देण्यात येते.

2024 मध्ये सुरुवात, उजळली 50 लाख घरं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाखो वीज वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या योजनेत 2027 पर्यंत 1 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट्ये आहे. आतापर्यंत सरकारी आकडे पाहता, 50 लाखांहून अधिक घर या सरकारी योजनेत उजळून निघाले आहेत. या योजनेमुळे भरमसाठ बिलापासून ग्राहकांची मोठी सुटका झाली आहे.

300 यूनिट मोफत वीज

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत 300 यूनिट मोफत वीज मिळते. घरावर सोलार पॅनल बसवले तर सरकारकडून 78,000 रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येते. या योजनेत दोन दशकांपर्यंत जवळपास शून्य वीज बिल येते. या योजनेत लाभार्थ्याच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यात येते. या सोलर पॅनलेच आयुष्य जवळपास 25 वर्षांचं असतं. यामुळे ते वारंवार बदलण्याचा खर्चही येत नाही. या योजनेला प्रत्येक राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या राज्यात अतिरिक्त 20 हजारांचा फायदा

मोदी सरकार पीएम सूर्यघर योजनेतंर्गत 78,000 रुपये सबसिडी देते. तर बिहार राज्यात स्थानिक नागरिकांना अजून 20 हजारांची अतिरिक्त सबसिडी देण्यात येते. म्हणजे या राज्यात ग्राहकांना एकूण 98 हजारांची सबसिडी मिळते. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतर राज्यातही राज्य सरकारवर सबसिडी देण्याचा दबाव वाढत आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असताना राज्य सरकारने सुद्धा काही वाटा उचलणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे योजनेला अधिक गती मिळेल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र