Poonch Attack : सॅल्यूट, कारगील युद्धात वडील शहीद झाले होते, पुँछ हल्ल्यात आता मुलगा, सॅल्यूट या शूर वडील-मुलगा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला

पूंछ येथील दहशतवादी हल्ल्यात लान्स नायक कुलवंत सिंह शहीद झाले. कारगिल युद्धात साल 1999 मध्ये त्यांचे वडील शहीद झाले होते. त्यानंतर 11 वर्षांनी साल 2010 मध्ये पित्याप्रमाणे कुलवंत सैन्यात भरती झाले होते.

Poonch Attack : सॅल्यूट, कारगील युद्धात वडील शहीद झाले होते, पुँछ हल्ल्यात आता मुलगा, सॅल्यूट या शूर वडील-मुलगा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला
kulwant singh
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 22, 2023 | 8:09 PM

नवी दिल्ली : जम्मू – कश्मीरच्या पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात परवा गुरूवारी भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. जवान सांगोटीया गावात इफ्तारचे सामान घेऊन जात असताना सहा अतिरेक्यांनी डाव साधून हल्ला केला. या हल्ल्यात बेछुट गोळीबार आणि हॅण्ड ग्रेनेडचा वापर केल्याने भारतीय जवान शहीद झाले, त्यात लान्स नायक कुलवंत सिंह देखील शहीद झाले. त्यांच्या वडीलांनी 1999 च्या कारगिल युद्धात देशासाठी प्राण दिले होते. शहीद वडीलांचा मुलगाही आपल्या वडीलांप्रमाणे मातृभूमीसाठी शहीद झाला. संपूर्ण देश या वीर पितापूत्रांचा त्याग कधीही विसरणार नाही.

पूंछ जिल्ह्यात अतिरेक्यांनी पाठीवर वार केला. पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अतिरेकी लपून छपून पाठमोरे आले आणि हल्ला केला. समोरून गेलो तर त्यांच्यापैकी एकाचाही जीव सलामत राहणार नाही याची त्यांना कल्पना होती. भारतीय लष्कराच्या पराक्रमासमोर त्यांना असा पाठून वार करणेच परवडणारे होते. राष्ट्रीय रायफल्सचे जवान कुलवंत सिंह या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मातृभूमीच्या कामी आले. आपचे नेते राघव चढ्ढा यांनी समाजमाध्यमावर त्यांचा फोटो पोस्ट करीत लिहिले आहे की, ‘पंजाबच्या धमन्यांतच देशभक्ती वाहत आहे. आणखी एक सुपूत्र तिरंग्यात लपेटून परतलाय.’ जम्मू- कश्मीरच्या पूंछ मध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात आपले पाच जवान शहीद झाले आहेत. लान्स नायक कुलवंत सिंह यांना देखील आपल्या वडीलांप्रमाणेच मातृभूमीसाठी वीर मरण आले आहे.

 

घरातल्या कोणाचेही ऐकले नाही

वडीलांना शहीद होऊन अकरा वर्षे झाली, तेव्हा कुलवंत साल 2010 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांच्यातही वडीलांप्रमाणे देशभक्तीने त्यांना झपाटले होते. देशासाठी काहीही करण्यास ते तयार होते. त्यांनी घरातील कोणाचेही ऐकले नाही सरळ ते सैन्यात भरती झाले. त्यांच्या मागे आज त्यांनी दोन लहान मुले आहेत. मुलगी दीड वर्षांची आणि तीन महिन्यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब मोगा येथील चाडीक गावात रहाते. त्यांच्या आईने म्हटले आहे की मुलाने घर सोडताना म्हटले होते की काही काळजी करू नका सर्वकाही ठीक होईल. परंतू अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत.