AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवन्ना 35 दिवसानंतर भारतात दाखल, SIT कडून अटक

Prajwal revanna arrest: प्रज्वल रेवन्ना याला शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसेच त्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करावे लागणार आहे. न्यायालयात एसआयटीकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटी प्रज्वल रेवन्नाची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करू शकते.

सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवन्ना 35 दिवसानंतर भारतात दाखल, SIT कडून अटक
Prajwal Revanna
| Updated on: May 31, 2024 | 8:19 AM
Share

Prajwal revanna : कर्नाटक जेडीएस नेते आणि सेक्स कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवन्ना अखेर भारतात परतला. निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना 35 दिवसानंतर बंगळूरमध्ये दाखल झाला. त्याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) विमानतळावरच अटक केली होती. प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाल्यानंतर 27 एप्रिल रोजी जर्मनीत पळून गेला होता. दरम्यान, प्रज्वल याला अटक केल्यानंतर विशेष पथकाने त्याला सीआयडी कार्यालयात नेले. रात्रभर त्याला सीआयडी ऑफिसमध्येच ठेवण्यात आले.

आज न्यायालयात हजर करणार

प्रज्वल रेवन्ना याला शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसेच त्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करावे लागणार आहे. न्यायालयात एसआयटीकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटी प्रज्वल रेवन्नाची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करू शकते.

प्रज्वलवर याच्या विरोधात आतापर्यंत लैंगिक छळाचे तीन गुन्हे दाखल आहेत. या आठवड्यात त्याने एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

देश सोडून पळला

कर्नाटकात लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना एप्रिलमध्ये देश सोडून पळून गेला होता. त्यानंतर एसआयटीच्या विनंतीवरून इंटरपोलने रेवन्नाविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती.

28 एप्रिल रोजी रेवन्ना याच्या घरात काम करणाऱ्या महिलेने तक्रार दिली होती. त्या महिलेने एच.डी. रेवन्ना आणि त्याचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यावर यौन शोषणाचा आरोप केला होता. ज्या महिलेने आरोप केला होती ती एच.डी. रेवन्ना याची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. तिला 2019 मध्ये रेवन्नाचा मुलगा सूरज याच्या लग्नात काम करण्यासाठी बोलवण्यात आले होते.

प्रज्वल रेवन्ना एनडीएचे उमेदवार

कर्नाटकातील हसन लोकसभा जागेवर २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. प्रज्वल येथून एनडीएचे उमेदवार आहेत. या जागेवर मतदान होण्यापूर्वीच हसनमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी आणि पहिली एफआयआर नोंदवण्याच्या एक दिवस आधी प्रज्वल जर्मनीला गेला होता.प्रज्वल रेवन्ना 27 एप्रिल रोजी राजनैतिक पासपोर्ट वापरून देशातून पळून गेला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.