भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात जनसुराजची जादू; 30 वर्षांचा गड कसा ढासळला? प्रशांत किशोर म्हणाले…

prashant kishor : प्रशांत किशोर यांनी बांकीपूरमध्ये विजय झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपची निवडणुकीची समीकरणे देखील फेल झाल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात जनसुराजची जादू; 30 वर्षांचा गड कसा ढासळला? प्रशांत किशोर म्हणाले...
| Updated on: Aug 04, 2026 | 2:55 PM

बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांच्या खेळीने भाजपचा 30 वर्षांच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रितिक्रिया दिली आहे. जनता भाजपच्या कार्यशैलीशी नाराज आहे. भाजपने जनतेवर नेतृत्व थोपवल्याचा आरोप केला.

प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘लोकशाहीत जिंकणाऱ्या पक्षाला नेता निवडण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेलाही मतपेटीतून संदेश देण्याचा अधिकार आहे. बांकीपरूरमध्ये जनसुराज पक्षाला मत देणारे मतदार हे भाजपविरोधी नाही. ते भाजपचे पारंपारिक मतदार होते. मतदारसंघातील मतदारांना पक्षाचा अहंकर मान्य नाही’.

प्रशांत किशोर यांनी पुढे म्हटलं की, जिंकणाऱ्या पक्षाने मुख्यमंत्री कोणालाही बनवले, तरी मतदारांकडेही मतदान करण्याची संधी आहे. बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे. या मतदानातून मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्ट संदेश दिला आहे. मला मतदान करणारी भाजपविरोधी नाही. तर भाजप समर्थक आहे. त्यांना भाजपचा अहंकार मान्य झाला नाही. या मतदारसंघात कुत्रा, मांजरीला तिकीट दिलं, तरी तुम्हाला मतदान करावे लागेल, असे भाजपने म्हटलं होतं’.

‘भाजपचं म्हणणं आहे की, आम्ही कोणालाही तिकीट देऊ, जनतेला आम्हालाच मतदान करावे लागेल. बिहारमधील जंगलराज मिटवण्याच्या नावाखाली मतदान घेणाऱ्या भाजपने एका चेहऱ्याला मुख्यमंत्री बनवलं. परंतु लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. ‘सर्वसामान्य जनता पंतप्रधान मोदींशी थेट जाऊन बोलू शकत नाही. त्यांच्याकडे मतदानातून पंतप्रधान मोदींना संदेश देण्याचं माध्यम आहे. जनसुराजने जनतेला आवाहन केलं होतं की, ‘तुम्हाला भाजप नेतृत्व आणि नवीन मुख्यमंत्र्‍यांविषयी असहमती दर्शवायची आहे, त्यांनी जनसुराज पक्षाला मतदान करावे. बांकीपूरमधील जनतेचा संदेश भाजपपर्यंत पोहचला आहे. बांकीपूरमधील 422 बूथपैकी 400 बुथवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचं बुथ मॅनेजमेंट, मतदारयादीच्या एका पानाचा प्रमुख, शक्ती सर्वकाही फेल ठरलं. त्यांची निवडणुकीची सर्व समीकरणे फेल ठरली, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us