AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Kishor Won: भाजपाचा सर्वात मोठा पराभव! प्रशांत किशोर यांनी गड उद्ध्वस्त केला, निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर!

Prashant Kishor Won: जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बांकीपूर विधानसभेला चांगलाचा धक्का दिला आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत.

Prashant Kishor Won: भाजपाचा सर्वात मोठा पराभव! प्रशांत किशोर यांनी गड उद्ध्वस्त केला, निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर!
प्रशांत किशोरImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 6:06 PM
Share

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. १९९५ पासून या मतदारसंघात भाजप किंवा त्यांच्या उमेदवारांनी सातत्याने विजय मिळवला आहे. सुरुवातीला नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि नंतर नितीन नवीन यांनी येथे भाजपाचे वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र आता जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या अभेद्य गडाला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामुळे आणि बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत.

किती मतांनी झाला विजय?

प्रशांत किशोर यांनी १८ हजार ९५३ मतांनी विजय मिळवला. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ३१ फेऱ्यानंतर त्यांना ६३ हजार २०३ मते मिळाली. भाजपच्या उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना ४४ हजार २५० मते तर राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा गुप्ता यांना १४ हजार ०८५ मते मिळाली.

पटना येथील या मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात मोठा राजकीय उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार सिन्हा यांचा पराभव केला. भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर पहिल्याच फेरीपासून आघाडीवर होते. आरजेडीच्या उमेदवार रेखा गुप्ता शर्यतीत पूर्णपणे मागे पडल्या. ३१ पैकी २२व्या फेरीअखेर प्रशांत किशोर यांनी १२ हजार ८०९ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती.

तिरंगी लढत

या तिरंगी लढतीत सुरुवातीला जन सुराज आणि भाजप यांच्यात अटीतटीची स्पर्धा अपेक्षित होती. मात्र विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. बांकीपूरच्या मतदारांनी आरजेडीला स्पष्ट नकार दिल्याचे निकालावरून दिसून आले.

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ अनेक दशकांपासून भाजपाचा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपचे नेते नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर भाजपने येथून युवा चेहरा म्हणून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली. मात्र स्थानिक मतदारांचा बदललेला कल ओळखण्यात भाजपकडून चूक झाल्याचे दिसून येते. प्रशांत किशोर यांनी आपल्या सक्रिय राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी या शहरी मतदारसंघाची निवड केली आणि त्यांचा हा डाव यशस्वी ठरला. स्थानिक सवर्ण मतदारांमधील नाराजी आणि बदलाची अपेक्षा बाळगणाऱ्या युवकांचा पाठिंबा यामुळे या मोठ्या राजकीय उलथापालथीची पार्श्वभूमी तयार झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मिळत असलेल्या आघाडीमुळे पटना येथील जन सुराज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले