Happy Teachers Day 2025: PM नरेंद्र मोदींसह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिवाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Happy Teachers Day 2025: PM नरेंद्र मोदींसह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
Dharmendra Pradhan
Updated on: Sep 05, 2025 | 4:16 PM

आज संपूर्ण देशात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती देशात हा दिन साजरा केला जातो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिवाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोंदींकडून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करताना लिहिले की, “सर्वांना, विशेषतः देशातील कष्टाळू शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बुद्धाचा विकास करण्यासाठी शिक्षकांचे समर्पण हा एक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. यासाठी शिक्षक महत्वाची आणि उल्लेखनीय भूमिका बजावत आहेत. यातून प्रतिष्ठित विद्वान आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली. राधाकृष्णन यांच्या स्मृतींना उजाळा मिळतो.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शुभेच्छा

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “देशाचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ ‘भारतरत्न’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांच्या जयंतीनिमित्त, मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि समाजाला दिशा देणाऱ्या, जीवनाला मूल्य देणाऱ्या आणि अज्ञान दूर करून ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या सर्व गुरूंना ‘शिक्षक दिना’निमित्त हार्दिक शुभेच्छा.

शिक्षक हे केवळ पाठ्यक्रम शिकविण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्याला विचार करण्याची दृष्टी, जगण्याची कला आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना शिकवतात. शिक्षक दिनामित्त, आपण आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांनी दिलेले आदर्श जीवनात आत्मसात करण्याची प्रतिज्ञा करूया.

राष्ट्रपतींकडूनही शुभेच्छा

‘आचार्य देवो भव’ या आपल्या प्राचीन परंपरेनुसार शिक्षकांना सर्वोच्च महत्त्व देण्याच्या त्यांच्या उदात्त कल्पनेबद्दल मी डॉ. राधाकृष्णन जी यांच्या पवित्र स्मृतीला आदरपूर्वक आदरांजली अर्पण करते.अन्न वस्त्र आणि निवारा यांच्याप्रमाणेच शिक्षण देखील आवश्यक आहे. देशातील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये व सन्मान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम करतात.