
तुम्ही एटीएम मशिन फसवणूकीच्या अनेक घटना पाहील्या असतील किंवा ऐकल्या असतील, परंतू जर एटीएमने बँकेशी गद्दारी केली असली … असा शब्दश: प्रकार उत्तर पूर्व दिल्लीच्या हर्ष विहार परिसरात घडला आहे. या परिसरातील एका एटीएममधून कॅश काढताना शंभर रुपये काढण्याचे बटण दाबले असता चक्क ५०० रुपये निघत होते. हा गोंधळ लक्षात येईपर्यंत सुमारे ११२ एटीएम कार्डधारकांनी पैसे काढले होते.यामुळे बँकेला आठ लाखांचा फटका बसल्याचे ऑडिट करताना समजले.
उत्तर पूर्व दिल्लीच्या हर्ष विहार परिसरातील एटीएममध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅश लोड करताना झाला आहे.एटीएममध्ये कॅश लोड करताना कर्मचाऱ्यांनी १०० रुपयांच्या ट्रेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या.याचा लाभ ११२ एटीएम कार्डधारकांनी उठवला.आणि आठ लाख रुपये अतिरिक्त काढले. ऑडिट करताना हा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले.आता या बँकेच्या एटीएममध्ये कॅश लोड करणाऱ्या कंपनीने बुधवार त्यांच्या दोघा कर्मचाऱ्यांविरोधात केस दाखल केली आहे.
या कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक नोटांच्या ट्रेची अदलाबदल केल्याचा आणि कार्डधारकांच्या मदतीने पैसे काढून घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.पोलिसांच्या मते जी कंपनी एटीएममध्ये कॅश लोड आणि अनलोड करते तिच्या शाखा व्यवस्थापकामार्फत ही केस दाखल केली आहे. शाखाव्यवस्थापकाने त्यांच्या तक्रारीत म्हटले की ज्या मार्गावर एटीएममध्ये कॅश लोड आणि अनलोड केली जाते. तेथे दोन कस्टोडीयन नियुक्त केले जात आहे.
कस्टोडियन बँकांकडून कॅश घेऊन एटीएममध्ये कॅशची लोडींग करण्यासह कॅश रिसायकलर आणि बल्क नोट एक्सेप्टरमध्ये ग्राहकांद्वारा जमा रुपयांना काढून बँकेत जमा करतात. एटीएमच्या वॉल्टचा पासवर्ड, एडमिन कार्डच्या एटीएम रूमची चावी कस्टोडियनकडे यांच्याजवळ असते. या घोटाळ्याचा थांगपत्ता 1 मे रोजी कंपनीचे कर्मचारी कॅश लोड आणि ऑडिटसाठी एटीएमवर गेल्यावर झाला.
जेव्हा कर्मचारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आणि ऑडिटसाठी गेला तेव्हा त्याला चुकीच्या पद्धतीने पैसे काढल्याचे आढळले. २९ एप्रिल रोजी कंपनीचे दोन कस्टोडियन एटीएममध्ये ३१ लाख रुपये भरण्यासाठी गेले होते. त्यांनी १०० रुपयांच्या नोटेच्या ट्रेमध्ये २००० आणि ५०० रुपयांच्या नोटा टाकल्या. त्यानंतर त्यांनी १०० रुपयांच्या सर्व नोटा ५०० रुपयांच्या नोटेच्या ट्रेमध्ये टाकल्या. त्यानंतर, त्यांनी हा ट्रे थोडा बाहेर काढून ठेवला होता. जेणेकरून ५०० रुपयांच्या ट्रेमध्ये ठेवलेल्या १०० रुपयांच्या नोटा अडकतील आणि बाहेर येणार नाहीत.
कंपनीचा आरोप आहे की दोन कस्टोडियनने कट रचून एटीएममध्ये गडबडी केली.त्यानंतर तिने त्यांच्या ओळखीच्या 112 एटीएम कार्डधारकांना पैसे काढण्यासाठी सांगितले. नंतर कार्डधारकांना 100 च्या एवजी 500 रुपयांच्या नोटा काढून कंपनी आठ लाखाचा चुना लावला. तसेच एका आरोपी कस्टोडीयनने सांगितले की नोटांची अदला-बदली जाणीवपूर्वक केली नाही. त्या दिवशी कंपनीने त्यास कॅश लोड करण्यासाठी पाठवले त्या दिवशी त्याची तब्येत नीट नव्हती. लवकर काम करण्याच्या नादात हे झाल्याचे त्याने सांगितले.